शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

‘इनकमिंग’वर कार्यकर्ते नाराज

By admin | Updated: September 10, 2014 09:13 IST

भारतीय जनता पार्टीमध्ये अन्य पक्षांमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर असलेला फिल्टर काढून घेण्यात आल्यावर परपक्षांतून लोंढे येऊ लागल्याने भाजपाचा मूळ कार्यकर्ता अस्वस्थ झाला आहे.

भाजपा : पक्षात अस्वस्थता, एकनाथ खडसेंनी दिली कबुली!संदीप प्रधान, मुंबईभारतीय जनता पार्टीमध्ये अन्य पक्षांमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर असलेला फिल्टर काढून घेण्यात आल्यावर परपक्षांतून लोंढे येऊ लागल्याने भाजपाचा मूळ कार्यकर्ता अस्वस्थ झाला आहे. गेली पंधरा वर्षे सत्ता उपभोगलेल्यांच्या पालख्या  पुढील पाच वर्षे उचलाव्या लागणार असतील तर अशी सत्ता येऊन काय कामाची, असा सवाल कार्यकर्ते खासगीत करीत आहेत.भाजपामधील अन्य पक्षीयांच्या प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याची कबुली खडसे यांनी दिली. मात्र त्या कार्यकर्त्यांचे प्रमाण नगण्य असल्याचा दावा केला. ज्या मतदारसंघात भाजपाची परि स्थिती मजबूत नाही. जेथे गेल्या २५ वर्षांत पक्षाचा आमदार निवडून आलेला नाही अशा ठिकाणी पर पक्षातून प्रवेश दिले जात आहेत, असे ते म्हणाले. शिवाय पक्षात प्रवेश करणाऱ्यांपैकी केवळ एक-दोघांचा अपवाद वगळता इतरांना उमेदवारी नको आहे, असे ते म्हणाले.खडसे यांचा दावा काहीही असला तरी अन्य पक्षातून येणारी मंडळी ही एकतर भाजपाचे सरकार आल्यास वेगवेगळ््या यंत्रणांकडून संरक्षण मिळावे याकरिता किंवा त्यांच्या सहकार क्षेत्रातील संस्थांना आर्थिक लाभ मिळत राहावा याकरिता येत आहेत,असे कार्यकर्त्यांचे मत आहे. गावित, पाचपुते यांना पक्षात घेतल्याने कदाचित ते दोन-चार मतदारसंघ भाजपाकडे येतील. मात्र अन्यत्र त्यांच्या प्रवेशाचा फटका बसणार नाही याची काय खात्री, असा सवाल कार्यकर्ते करीत आहेत. प्रवेश करणाऱ्या काहींनी कुठलीही उमेदवारी मागितली नसली तरी भविष्यात राज्यसभा, विधान परिषद, महामंडळांची अध्यक्षपदे यावर काँग्रेस-राष्ट्रवादीतून येणारी ही मंडळी दावा करणार. अशावेळी भाजपातील प्रामाणिक कार्यकर्त्यांचा विचार होणार की नाही, अशी चिंता कार्यकर्ते खासगीत व्यक्त करीत आहेत. फ्री इनकमिंग सुरूच !वादग्रस्त माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते यांच्याबरोबर किमान ३५ जणांना भाजपाने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेश दिला. त्यानंतर मंगळवारी जावळीचे माजी आमदार सदाशिवराव सपकाळ, उस्मानाबादचे माजी खासदार शिवाजीराव कांबळे, भारिपच्या उज्ज्वला जाधव आदींनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.पुन्हा तेच होणार का ?राज्यात पुलोदचे सरकार होते तेव्हा व शिवसेना-भाजपा युतीचे सरकार होते तेव्हाही अनेक मंडळी पक्षात आली होती. त्यांनी मंत्रीपदे, राज्यसभेची खासदारकी पदरात पाडून घेतली होती. तेच पुन्हा घडणार असेल तर सत्ता येऊनही गेली पंधरा वर्षे संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचे काय होणार, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.