शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफिया, धान्य साठेबाजांवर आता ‘एमपीडीए’नुसार कारवाई

By admin | Updated: December 23, 2015 01:52 IST

जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे तसेच वाळूमाफियांवर आता थेट ‘एमपीडीए’अंतर्गत (महाराष्ट्र प्रेव्हेन्शन आॅफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटी अ‍ॅक्ट) कारवाई होणार आहे.

नागपूर : जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे तसेच वाळूमाफियांवर आता थेट ‘एमपीडीए’अंतर्गत (महाराष्ट्र प्रेव्हेन्शन आॅफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटी अ‍ॅक्ट) कारवाई होणार आहे. यासंदर्भातील सुधारणा विधेयकाला विधान परिषदेने मंगळवारी मंजुरी दिली. राज्यातील वाळूतस्करी तसेच धान्याच्या साठेबाजीवर यामुळे नियंत्रण येणार आहे. काळ्याबाजारात धान्यमाफियांचे प्रमाण सध्या खूप वाढत आहे. मोठ्या प्रमाणावर बेकायदा वाळूचे उत्खननही केले जात आहे. त्याला विरोध करणाऱ्या अधिकारी - कर्मचारी वाळूमाफियांकडून जीवघेणे हल्ले होत आहेत. हा गुन्हेगारीचा प्रकार आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी ‘एमपीडीए’ कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने सप्टेंबरमध्ये घेतला होता. त्यानुसार ‘एमपीडीए’ कायद्याच्या व्याख्येत बदल करून महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्ये गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन व त्यांच्या घातक कृत्यांना आळा घालणे याचबरोबर सराईत धान्य आणि वाळूमाफियांचाही या कायद्यात समावेश करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.विधानसभेत गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी हे विधेयक मांडले. शरद रणपिसे, किरण पावसकर, जयंत पाटील यांनी विविध मुद्दे मांडले व आणखी काही सुधारणा सुचविल्या. सर्वसंमतीने हे सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले.