शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर अफवांचा पाऊस, अफवा पसरवणा-यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 05:15 IST

मुंबईत मंगळवारपासून मुसळधार पावसास सुरुवात झाली. त्यातच बुधवारी दुपारी ३च्या सुमारास मुंबईत वादळ धडकणार आहे, अशी अफवा मंगळवारी मध्यरात्रीपासून सोशल मीडियावर पसरली.

मुंबई : मुंबईत मंगळवारपासून मुसळधार पावसास सुरुवात झाली. त्यातच बुधवारी दुपारी ३च्या सुमारास मुंबईत वादळ धडकणार आहे, अशी अफवा मंगळवारी मध्यरात्रीपासून सोशल मीडियावर पसरली. अफवांच्या या पावसामुळे मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले. मात्र, मुंबईत असे कोणतेही वादळ धडकणार नसून, नागरिकांनी हा संदेश फॉरवर्ड करू नये आणि कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने नेटीझन्सना केले. मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानेही चक्रीवादळाची अफवा असल्याचे सांगितले, तरीही बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मुंबईकरांच्या मनातील भीती कायम होती.दुपारी ३ वाजता मुंबईत वादळ धडकले, तर अनर्थ घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून वांद्रे-वरळी सी लिंक, पेडर रोड बंद ठेवण्यात आला आहे. सायन ब्रिजही बंद करून वाहनांना माघारी पाठविण्यात येत आहे. पावसामुळे वांद्रे ते सांताक्रुझपर्यंत एस. व्ही. मार्ग बंद आहे, अशा अनेक अफवांचे संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरत होते. हे संदेश पूर्णपणे चुकीचे असून, नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले. दुसरीकडे अनेकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर लोकल बंद झाल्याचे संदेश आल्याने गोंधळ उडाला होता. मुंबईत अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. कोणीही घरातून बाहेर पडू नका, असे मेसेजेसही फिरत होते.>चक्रीवादळ येणार आहे. त्यामुळे वांद्रे वरळी समुद्रसेतू मार्ग बंद केला आहे, अशा बातम्या सोशल मीडियावरून पसरवण्यात आल्या. पालिकेने याची गंभीर दखल घेतली असून हा संदेश पसरवणाºयांचा शोध सुरू केला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, प्रकरण १०, कलम ५४ अंतर्गत खोटी माहिती देऊन मुंबईकरांमध्ये भीती निर्माण केल्याबद्दल कारवाईचे निर्देश संबंधितांना द्यावे, अशी सूचना आयुक्त अजय मेहता यांनी सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांना केली आहे. दोषीला एक वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.