ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - वाहतुक नियमांचे उल्लघंन करणारे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या फॅन्सी नंबर प्लेटच्या गाडीवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत. शनिवारी सोलापूर दौ-यावर आलेले चंद्रकांत पाटील यांच्या गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट होती. या गाडीची नंबर प्लेट बीजेपी या अक्षरांमध्ये डिझाईन केली आहे.
त्यामुळे गाडीचा नेमका क्रमांक पाहणा-याला समजत नाही. एकीकडे राज्यातील युती सरकारच्या हेल्मेट सक्तीच्या निर्णयाबद्दल विरोधाचे सूर उमटत असताना स्वत: सरकारमधील मंत्रीच वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे समोर आले. त्यामुळे वाहतुकीचे नियम सर्वसामांन्यासाठीच आहेत का ? असा प्रश्न निर्माण झाला होता.
वृत्तवाहिनीवर यासंबंधीचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर दिवाकर रावते यांनी पाटील यांच्या फॅन्सी नंबर प्लेटच्या गाडीवर कारवाई करण्याचे आदेश दिले.