शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय न बांधणाऱ्यांवर होणार कारवाई

By admin | Updated: September 20, 2016 19:35 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत घरात शौचालय बांधकामासाठी शासनाकडून अनुदान घेऊन बांधकाम न करणाऱ्या सहा लाभार्थींविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावी

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. २० : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत घरात शौचालय बांधकामासाठी शासनाकडून अनुदान घेऊन बांधकाम न करणाऱ्या सहा लाभार्थींविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावी, असे पत्र नंदुरबार पालिकेने शहर पोलीस ठाण्यात दिले आहे़ स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक स्वच्छता गृह बांधकाम करण्यात यावेत यासाठी पहिल्या टप्प्यात लाभार्र्थींना सहा हजार रूपयांचे अनुदान देण्यात आले होते़ हे अनुदान प्राप्त झाल्यानंतरही ललिता मनोहर तमायचेकर, आशा कांतीलाल बजरंगे, शारदा अश्विन तिलंगे, शंकर हुकुमसिंग तिलंगे, अनिता बुद्धासकट, पूर्णाबाई वसंत तमायचेकर सर्व रा़ कंजरवाडा यांनी शौचालयांचे बांधकाम सुरू केले नाही़ याबाबत पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी संबधितांना वारंवार सूचना करूनही त्यांनी बांधकाम सुरू करण्याची कारवाई केली नाही़ पालिकेच्या अधिकाऱ्यांनी समक्ष भेटी देऊनही कारवाई न झाल्याने अखेर पालिकेने कारवाईचे पाऊस उचलले आहे़

राज्यात लाभ घेऊनही बांधकाम पूर्ण न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे़ यापूर्वी कोणत्याही पालिकेने असे पाऊल उचललेले नसल्याची माहिती आहे़ नंदुरबार पालिकेने दिलेल्या पत्रावर शहर पोलीस ठाण्यात केव्हा कारवाई होणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही़ मात्र लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़