शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हयगय केल्यास होणार कारवाई

By admin | Updated: June 8, 2017 03:52 IST

कामाचा दर्जा आणि प्रगती याविषयी हयगय केल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी विविध रस्त्यांची पाहणी करून कामाचा दर्जा आणि प्रगती याविषयी हयगय केल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले. दरम्यान, काही ठिकाणी काम समाधानकारक नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांविषयी त्यांनी उघड नाराजी व्यक्त करून कामात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. बुधवारी सकाळी ११ ते २ या कालावधीत जयस्वाल यांनी पायी फिरून मानपाडानाका ते टिकुजिनीवाडी चौक रस्त्याची पाहणी केली. या वेळी त्यांनी फुटपाथची दुरुस्ती, फ्लॉवर बेड, कर्ब स्टोन बसवणे, मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, विजेचा ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करणे, रस्त्यालगतच्या गटारांची साफसफाई करणे तसेच चेंबर कव्हर्स बसवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना दिल्या. टिकुजिनीवाडी चौकामध्ये रस्ता रुंदीकरण झालेल्या ठिकाणी नव्याने चौक निर्माण करण्याच्या सूचना देतानाच रस्त्याला पर्यायाने वाहतुकीस अडथळा ठरणारा वृक्ष स्थलांतरित करण्याच्या सूचना देतानाच निसर्ग उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे फिनिशिंग, पार्किंग आणि फेरीवाला क्षेत्र निश्चित करणे, जोडरस्त्यांच्या ठिकाणी डांबर टाकून सपाटीकरण करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी जयस्वाल यांनी ग्लॅडी अल्वारीस रस्त्याची पाहणी करून अर्धवट असलेली कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर गांधीनगर ते बेथनी हॉस्पिटल, उपवन तलाव येथील कल्व्हर्ट तसेच पोखरण रोड नं. २ च्या रस्त्याची पाहणी करून ठिकठिकाणी अर्धवट राहिलेल्या ठिकाणी तत्काळ डांबर टाकण्याचे आदेश दिले. दरम्यान, या वेळी त्यांनी ज्याज्या ठिकाणी कामे सुरू आहेत, त्यात्या ठिकाणी सुरक्षिततेचा उपाय म्हणून संरक्षक कठडे उभे करण्याचे तसेच त्या ठिकाणी कामाच्या सूचनेचा नामफलक लावण्याच्या सूचना दिल्या. या वेळी त्यांच्यासोबत उपायुक्त संदीप माळवी, नगर अभियंता रतन अवसरमोल, शहर विकास व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर, कार्यकारी अभियंता भरत भिवापूरकर, मोहन कलाल, नितीन पवार, डॉ. हळदेकर आदी अधिकारी उपस्थित होते.>वृक्ष स्थलांतरित करानव्याने चौक निर्माण करण्याच्या सूचना देतानाच रस्त्याला पर्यायाने वाहतुकीस अडथळा ठरणारा वृक्ष स्थलांतरित करण्याच्या सूचना देतानाच निसर्ग उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे फिनिशिंग, पार्किंग आणि फेरीवाला क्षेत्र निश्चित करणे, जोडरस्त्यांच्या ठिकाणी डांबर टाकून सपाटीकरण करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी जयस्वाल यांनी ग्लॅडी अल्वारीस रस्त्याची पाहणी करून अर्धवट असलेली कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.