शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

By admin | Updated: January 7, 2016 02:14 IST

महापालिकेच्या आस्थापनेवर काम करणाऱ्या ३० दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. काही कर्मचाऱ्याना पालिकेत रूजु होऊन २७ वर्षे तर काहींना ५ वर्षे झाली आहेत.

ठाणे : महापालिकेच्या आस्थापनेवर काम करणाऱ्या ३० दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. काही कर्मचाऱ्याना पालिकेत रूजु होऊन २७ वर्षे तर काहींना ५ वर्षे झाली आहेत. पण त्यांनी अजूनही पालिकेचे तोंडच पाहिलेले नाही. त्यामुळे कामावर हजर न होणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांची यादीच पालिका प्रशासनाने तयार केली असून त्यांना नोटीस देण्याचे काम आता सुरू केले आहे. वर्ग-३ आणि ४ श्रेणींतील हे सर्व कर्मचारी असून त्यांनी वेळेत प्रतिसाद न दिल्यास पुढची कारवाई करण्याचा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे. आधीच महापालिकेत विविध स्वरूपाची २४०० पदे रिक्त आहेत. मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या या पदांमुळे पालिकेचा कारभार चालवणे प्रशासनाला कठीण जात असताना दुसरीकडे आस्थापनावर काम करणाऱ्या दांडीबहाद्दरांची संख्यादेखील मोठी आहे. ठाणे महापालिकेच्या हॉस्पिटल, प्रभाग समिती आणि इतर विभागांमध्ये विविध पदांवर कर्मचारी काम करतात. रिक्त पदे भरण्यासाठी कार्मिक विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये ३० कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे कार्यालयाचे तोंड बघितलेले नाही, असे दिसून आले. तर काही कर्मचारी ५ ते ६ वर्षे कामावर रुजू झालेले नाहीत. नर्स, लिपीक, शिपाई, वॉर्डबॉय अशा वर्ग-३ आणि ४ श्रेणींतील कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यातच विविध संवर्गांतील २४०० पदे रिक्त असल्यामुळे प्रशासनावर किंबहुना महापालिकेच्या अधिकारीकर्मचारीवर्गावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असताना अशा दांडीबहाद्दरांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)