नवी मुंबई : वाशी सेक्टर ९ मध्ये रोडवरील अनधिकृत मार्केटवर पालिकेने कारवाई केली. येथील जवळपास १०० पेक्षा जास्त फेरीवाल्यांना हटविण्यात आले असून परवानाधारक फेरीवाल्यांचे इतरत्र पुनर्वसन केले जाणार आहे. येथील मोतीमाला ज्वेलर्सला लागून असलेल्या रोडवर दोन्ही बाजूला भाजी, फळ व इतर विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू करताच जुहूनगर फेरीवाला संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान महापालिकेने फक्त फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली नसून पात्र फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली नाही. पालिकेला म्हणणे सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. पालिका आयुक्त तुकाराम मुुंढे यांच्या आदेशानंतर अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, डॉ.कैलास गायकवाड, दत्तात्रय नांगरे, महेंद्रसिंग ठोके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वाशीतील फेरीवाल्यांवर कारवाई
By admin | Updated: June 30, 2016 02:48 IST