शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅप’मधील गैरव्यवहार उघड करणाऱ्यांवरच कारवाई

By admin | Updated: April 15, 2017 01:40 IST

महाराष्ट्र बँकेच्या यूपीआय अ‍ॅपमधून झालेला ८५ लाखांचा गैरव्यवहार उघडकीस आणणाऱ्यांच्याच पाठीमागे बँकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

लातूर : महाराष्ट्र बँकेच्या यूपीआय अ‍ॅपमधून झालेला ८५ लाखांचा गैरव्यवहार उघडकीस आणणाऱ्यांच्याच पाठीमागे बँकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे या आठ ग्राहकांची धावाधाव सुरू आहे.उदगीर येथील बाळासाहेब राजकुमार बिराजदार या प्लॉटिंग व्यावसायिकाकडे युसुफ जावेद शेख याने १ एकर ५ गुंठ्यांचा १ कोटी ५ लाखांचा सौदा केला. हे पैसे आपल्याला बँकेद्वारे दिले जातील, असे सांगितले. त्यामुळे बिराजदार यांनी महाराष्ट्र बँकेचे युपीआय अ‍ॅप इन्स्टॉल केले. सुरुवातीस स्वत:चे तसेच अन्य दोघांचे खाते क्रमांक दिले. या तिन्ही खात्यांवर प्रत्येकी ५-५ लाख रुपये जमा झाले. त्यानंतर बिराजदार यांनी आणखी पाच जणांचे खाते क्रमांक दिले असता या खात्यांवर ८५ लाख रुपये जमा झाले.शंका आल्याने बिराजदार यांनी लातूरचे झोनल मॅनेजर महेश बन्सवाणी यांना अ‍ॅपच्या माध्यमातून खात्यात पैसे नसतानाही समोरील खात्यात पैसे जात असल्याचे पुराव्यानिशी दाखविले. मात्र, त्यानंतर बँकेने या पैशांसाठी या आठही खातेदारांकडे तगादा लावण्याबरोबर नोटिसाही बजावल्या. मी दिलेल्या आठ खात्यांवर ८५ लाख रुपये जमा झाले असले, तरी त्यापोटी मी रोख ३० लाख रुपये बँकेकडे भरणा केला आहे. तसेच १५ लाख रुपये बँकेने खात्यावरून वळते करून घेतले आहेत. उर्वरित ४० लाख रुपये भरण्यासाठी बँकेकडे दोन महिन्यांचा कालावधी मागितला असता तो दिला जात नसल्याचे बाळासाहेब बिराजदार यांनी सांगितले. वास्तविक पाहता हा घोटाळा मीच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र आमच्यावरच गुन्हे दाखल केले जात असल्याचे सांगितले. या प्रकरणी त्यांनी उदगीर न्यायालयात बँकेविरोधात धाव घेतली आहे़अधिकाऱ्यांनी टाळले भाष्य...या संदर्भात महाराष्ट्र बँकेचे लातूरचे झोनल मॅनेजर महेश बन्सवाणी यांच्याशी संपर्क साधला असता हे प्रकरण न्यायालयात दाखल झाले आहे. त्यामुळे काहीही बोलणे योग्य नसल्याचे सांगून त्यावर भाष्य टाळले.