शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जोगेश्वरीतील ‘त्या’ गर्दुल्यांवर कारवाई

By admin | Updated: November 3, 2016 05:24 IST

जोगेश्वरीच्या शामनगर झोपडपट्टीत गर्दुल्यांनी विवाहितेवर सोमवारी रात्री सामूहिक बलात्कार केला.

मुंबई : जोगेश्वरीच्या शामनगर झोपडपट्टीत गर्दुल्यांनी विवाहितेवर सोमवारी रात्री सामूहिक बलात्कार केला. या प्रकारामुळे या परिसरात अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे अंबोली पोलिसांनी गर्दुल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.शामनगरमध्ये ठिकठिकाणी गर्दुल्ले आणि चरसी लोक घोळका करून उभे असतात. रात्रीच्या वेळेस या लोकांचा वावर या परिसरात वाढतो. मात्र घाबरुन एकही जण तक्रार करण्यास पुढाकार घेत नाही. महिला आणि मुलींना पाहून अश्लील हालचाली आणि शेरेबाजी या टोळक्यांकडून केली जाते. ज्यामुळे त्यांची या विभागात दहशत निर्माण झाली असून त्यांच्या विरोधात एकही तक्रार पोलिसांना करण्यात आलेली नाही. ह्यमात्र शामनगरमध्ये महिलेवर झालेल्या अत्याचारानंतर या टोळक्यांवर कारवाई करण्यास अंबोली पोलिसांनी सुरुवात केली आहे. जर स्थानिकांना अशा प्रकारे त्रास दिला जात असेल तर त्यांनी याबाबत अंबोली पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. दरम्यान, अंबोली पोलिसांनी अटक केलेल्या आठही आरोपीविरोधात ठोस पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. आठ पैकी पाच जणांवर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यासाठी आरोपी आणि पीडित महिलेचे कपडे फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहेत. तसेच ज्या झोपडीत हा प्रकार घडला त्याला बंद करून त्याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. >पोलिसांनाही मन:स्तापचरसी आणि गर्दुल्यांना पकडण्यास पोलिसही पुढाकार घेत नाहीत. कारण एक तर ते शुद्धीत नसतात आणि दुसरे म्हणजे एखाद्या वेळी त्यांना पोलीस ठाण्यात डांबले तर ते याठिकाणी नैसर्गिक विधी करण्यासही मागे पुढे पाहत नाही, त्यामुळे याचा मन:स्ताप पोलिसांना होतो. त्यामुळेच त्यांची हिम्मत वाढली असल्याचे शामनगरमधील एका रहिवाशाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तसेच एखादा तक्रार करायला गेला तर त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता असते त्यामुळे या भानगडीत न पडता सरळ दरवाजा बंद करून बसलेले बरे, असेही एकाने सांगितले.