शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमच्या लाचखोर पशुसंवर्धन अधिका-यावर कारवाई

By admin | Updated: January 20, 2016 02:15 IST

बदली टाळण्यासाठी पाच हजाराची मागणी.

वाशिम : पशुधन पर्यवेक्षकाची प्रशासकीय बदली केली नाही, म्हणून त्याला पाच हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी वाशिम जिल्हा परिषदेचा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.ए. कल्यापुरे याच्याविरूद्ध मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. वाशिम जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत १ जुलै २0१५ रोजी तीन प्रशासकीय बदल्या होणार होत्या; परंतु इतर पशुधन पर्यवेक्षकांनी विनंती अर्ज केल्याने त्यांच्या बदल्या आधी करण्यात आल्या. तक्रारदार पशुधन पर्यवेक्षकाने कोणताही अर्ज न केल्यामुळे बदली करण्यात आली नाही. त्यादरम्यान तक्रारदार हा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयामध्ये कामानिमित्त गेला होता. त्यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कल्यापुरे याने त्याची बदली आपण होऊ दिली नसल्याचे सांगून, त्या मोबदल्यात त्याला पाच हजार रूपये लाचेची मागणी केली. ८ सप्टेंबर २0१५ रोजी तक्रारदाराने यासंदर्भात कल्यापुरे याच्याविरोधात वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली. अधिकार्‍यांनी या तक्रारीची पडताळणी केली असता, संबंधित अधिकार्‍याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक ए.जी. रूईकर यांनी कल्यापुरे याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली.