शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांचा दे दणका! महापालिकेच्या नगररचना विभागातील आर्किटेक्टवर बडतर्फीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 20:50 IST

या तक्रारीची राज्याच्या मुख्यमंत्री व नगरविकास खात्याने गंभीर दखल घेतली होती.

आशिष राणे, लोकमत न्यूज नेटवर्क - वसई  

वसई :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील वास्तुविशारद (आर्किटेक्ट) तालिकेवरील सदस्य सनत एन.मेहता, रा.  बोरिवली (vvcmc/Lic.eng.09) यांनी कथीतपणे 'दि इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) या संस्थेची बोगस पदविका धारण केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त गंगाथरन डी यांच्या आदेशाने  त्यांचे तालिका सदस्यत्वच रद्द केल्याची माहिती नगररचना विभागाचे उपसंचालक शिवा एस. रेड्डी यांनी लोकमत ला दिली. या गंभीर प्रकरणी महापालिका आयुक्त गंगाथरन डी यांनी अभियंता सनत एन मेहता यांना पालिकेच्या नगररचना विभागास आदेश दिल्यानुसार उपसंचालक यांच्या स्वाक्षरीने दि. १६ एप्रिल २०२१ रोजीच्या पत्रांनव्ये बडतर्फ म्हणून सूचित केले आहे.

या तक्रारीची राज्याच्या मुख्यमंत्री व नगरविकास  खात्याने गंभीर दखल घेत वसई विरार शहर महापालिकेच्या नगररचना विभागाकडे नगरविकास खात्याच्या अव्वर सचिव निकेता पांडे यांनी स्पष्टीकरण मागवले होते. अखेर सखोल चौकशी व उपलब्ध कागदपत्रांच्या छाननीनंतर वास्तुविशारद सनत एन मेहता याच्यावर महापालिका प्रशासनाने बडतर्फीची  कारवाई केली आहे.

दरम्यान, वसई विरार महापालिकेच्या या दणकेबाज  कारवाईनंतर या प्रकरणातील मूळ तक्रारदार शिवसेनेचे उपशहरप्रमुख सुनील मुळ्ये  यांनी नगररचना विभागातील वास्तुविद्या विशारद तालिका सदस्य या नात्याने सनत एन मेहता यांनी दिलेल्या सूचना, या सूचनांच्या आधारे वसई विरार चा विकास आराखडा निर्मिती प्रक्रियेत घेतलेले विविध निर्णय याचे पुनर्विलोकन करण्याची मागणी सुद्धा यानिमित्ताने नगरविकास व पालिका प्रशासनाकडे केली असल्याचे 'लोकमत'ला सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना मुळ्ये यांनी सांगितले की,हा सर्व प्रकार अतिशय गंभीर  असून महापालिकेच्या नगररचना विभागाच्या वास्तुविद्या विशारद तालिकेतील  सदस्य शहराच्या विकास आराखड्याच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान देत असतात या प्रक्रियेत अनेक वेळा विविध भूखंडाशी निगडीत हितसंबंधांचा प्रश्न असतो, त्यामुळे कथीतपणे खोट्या पदविकेच्या आधारे 'रा' चा 'ता' दाखवून मान उंच करत आजवर वास्तुविशारद तालिकेवर विराजमान राहिलेल्या सनत एन मेहता यानी घेतलेल्या निर्णयांचे पुनर्विलोकन होणं अत्यंत गरजेचे असल्याचे सुनील मुळ्ये सांगत आहेत. या संदर्भात बडतर्फ करण्यात आलेले पालिका नगररचना विभागाचे तालिकेवरील अभियंता सनत मेहता यांना संपर्क केला असता मात्र तो झाला नाही.

सनत मेहता यांच्यावरिल कारवाई ही कायद्याच्या चौकटीत राहून केली आहे तसे लेखी निर्देश त्यांना दि 16 एप्रिल 2021रोजी देण्यात आले आहेत तर केलेल्या कारवाईचा अहवाल नगरविकास खात्यास दिला आहे. इतर बोगस अभियंत्यावरील कारवाई साठी आता आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे व त्यानुसार चौकशी सुरू आहे. - शिवा एस रेड्डी, उपसंचालक, नगररचना विभाग, वसई विरार शहर महानगरपालिका (मुख्यालय)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार