शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कारवाईचा वेग मंदावलेला

By admin | Updated: June 9, 2017 02:13 IST

मुंबईत बेकायदा बांधकामांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यावरील महापालिकेचा कारवाईचा वेग मंदावलेलाच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत बेकायदा बांधकामांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यावरील महापालिकेचा कारवाईचा वेग मंदावलेलाच आहे. रस्त्यावर अतिक्रमण करणारे फेरीवाले अथवा बेकायदा बांधकामांवर कारवाई होत असल्याचा दावा महापालिका अधिकारी करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र दररोज सरासरी एकाच बेकायदा बांधकामावर महापालिका कारवाई करीत असल्याचे आकडेवारीवरून उजेडात आले आहे. रस्त्यावर ठाण मांडणारे फेरीवाले, मोकळ्या भूखंडांवरील अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी पालिकेने बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम सुरू केली. गेले वर्षभर या मोहिमेअंतर्गत कारवाई सुरू आहे. वर्षभरात सुमारे ११ हजार बेकायदा बांधकामांवर २४ विभाग कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र या कारवाईसाठी प्रशासन आपल्या अधिकाऱ्यांची पाठ थोपटत असले तरी प्रत्यक्षात हा मोठा आकडा केवळ धूळफेक असल्याचे बोलले जात आहे. एप्रिल २०१६ ते एप्रिल २०१७ या १३ महिन्यांच्या कालावधीत ११ हजार ४१३ बांधकामांवर महापालिकेने कारवाई केली आहे. म्हणजेच दररोज सरासरी २९ बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. याचाच अर्थ प्रत्येक वॉर्डात दररोज जेमतेम एकच कारवाई होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.वर्षात ५ हजार झोपड्यांवर कारवाईगेल्या १३ महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने तीन हजार ६१९ निवासी, दोन हजार ५०६ व्यावसायिक, तर पाच हजार २८८ झोपड्या तथा कच्च्या स्वरूपाच्या बांधकामांवर कारवाई केली आहे. एका वर्षात पाच हजार झोपड्यांवरच कारवाई करणे महापालिका अधिकाऱ्यांना शक्य झाले आहे. >१३ हजार बांधकामे तोडल्याचा दावामुंबईतील अनधिकृत फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते आणि बांधकामांवर वर्षभरात १३ हजार ४१३ बांधकामे तोडल्याचा दावा महापालिकेने केला आहे. वर्षभरातील ही कारवाई असून त्यात सर्वाधिक बांधकामे एफ उत्तर व एम पश्चिम विभागातील आहेत. अनधिकृत व्यवसायांवर हातोडाएप्रिल २०१६ ते एप्रिल २०१७ या १३ महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने तीन हजार ६१९ निवासी, दोन हजार ५०६ व्यावसायिक तर पाच हजार २८८ झोपड्या आणि कच्च्या स्वरूपाची बांधकामे तोडली. एफ उत्तर विभागात सर्वाधिक कारवायामाटुंगा, शीव, चुनाभट्टी, वडाळा, अ‍ॅण्टॉप हिल यासारख्या एफ उत्तर विभागात सर्वाधिक एक हजार ८४०, त्याखालोखाल एम पश्चिम विभागातील चेंबूर, टिळकनगर आदी परिसरातील एक हजार १९० आणि आर उत्तर विभागात एक हजार ९५ अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.