शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सात बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई

By admin | Updated: July 22, 2016 02:20 IST

बांधकाम व्यवसायिकाने सदनिका बांधून जनता बँका व वित्तसंस्था यांची २०० कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी सात विकासकांना पोलिसांनी तांब्यात घेतले आहे.

पारोळ/वसई : नालासोपारा येथील महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व्हे नं ४११ मधील भूखंडावर बिगरशेती प्रमाणपत्र, सिडको परवाने, असे खोटे दस्तऐवज सादर करून बांधकाम व्यवसायिकाने सदनिका बांधून जनता बँका व वित्तसंस्था यांची २०० कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी सात विकासकांना पोलिसांनी तांब्यात घेतले आहे. यामध्ये विजय नितोरे (साई दर्शन कंस्ट्रक्शन), सुभाष माने (नवलादेवी इन्फ्रास्टक्चर), दुर्गा बी जगतसिंग (नवदुर्गा बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलर्स), उदय चव्हाण (मनीषा इण्टरप्रायझेस), अखिलेश यादव (ओम साई बिल्डर्स डेव्हलपर्स), रुपेश बराडकर, (साई शक्ती इण्डरप्रायझेस), सुनील कोळंबे (भवानी कंस्ट्रक्शन) या बांधकाम व्यावसायिकांना नालासोपरा पोलिसांनी ताब्यात घेतले.या प्रकरणात ३१ गुन्हे दाखल करण्यात आले असतानाही फक्त सातच विकासकांना अटक करण्यात आली. गुन्हे दाखल होऊन दोन महिन्यांचा कालावधीत पोलिसांनी फक्त ७ जणांना अटक केली. तसेच महसूल प्रशासनाचीही भूमिकासुद्धा या आरोपींना पाठीशी घालत असून त्यांनी जागा केवळ कागदोपत्री शासन जमा करण्यापलिकडे कोणतीही कारवाई न करता शासन जमा जागेवरील बेकायदा बांधकामांना अभय दिले. या प्रकरणात गुंतलेले तसेच त्यांना सहाय्य करणारे तसेच जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी नगरविकास राज्य मंत्री रणजित पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचे पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)>‘‘सर्व्हे नं ४११ भूखंडावर १२ एकर जागेत अनधिकृत भराव करून महसूल ही बुडला तसेच सदनिका बांधण्यासाठी रेती परवाने नसतानाही रेती बांधकामाच्या ठिकाणी आली कशी त्याचप्रमाणे बिगरशेती प्रमाणपत्र, सिडको परवाने या व्यवसायिकांना दिले कोणी, यांची चौकशी करून जनतेला घराचे स्वप्न दाखवून लुटणाऱ्या विकासक, महसूल विभाग, पालिका प्रशासन या मधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.’’ - मनोज पाटील, उपाध्यक्ष भाजप, वसई-विरार