शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नेरूळमध्ये धार्मिक स्थळांवर कारवाई

By admin | Updated: June 29, 2016 02:10 IST

महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने नेरूळमधील पदपथ, पूल व इतर रहदारीच्या ठिकाणी अनधिकृतपणे उभारलेल्या पाच धार्मिक स्थळांवर कारवाई केली.

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने नेरूळमधील पदपथ, पूल व इतर रहदारीच्या ठिकाणी अनधिकृतपणे उभारलेल्या पाच धार्मिक स्थळांवर कारवाई केली. पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात आली. नवी मुंबईमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी पदपथ, रोड व इतर मोकळ्या जागांवर धार्मिक स्थळ तयार करून जागा अडविण्यात आली होती. काही ठिकाणी मार्केट व इतर महत्त्वाच्या सार्वजनिक उपक्रमांसाठी राखीव असलेल्या भूखंडावरही अतिक्रमण करण्यात आले आहे. शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी पालिकेने यापूर्वी प्रसिद्ध केली होती. त्यामधील कायम करता न येणाऱ्या धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी नेरूळ सेक्टर १० मधील साईबाबा हॉटेलशेजारील साई मंदिर, सेक्टर ६ मधीन दर्शन दरबारकडे जाणाऱ्या कॉर्नरवरील व त्याच परिसरातील दुसऱ्या मंदिरावरही कारवाई करण्यात आली. डी. वाय. पाटील संकुल व राजीव गांधी पुलाखाली असलेल्या छोट्या मंदिरावरही कारवाई करण्यात आली. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण उपआयुक्त सुभाष इंगळे, कैलास गायकवाड, विभाग अधिकारी उत्तम खरात व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त बोलावण्यात आला होता. (प्रतिनिधी)