शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कृती आराखडा कागदावरच

By admin | Updated: June 6, 2017 00:21 IST

नांदेड: यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांसाठी १० कोटी ७० लाख तर एप्रिल ते जूनसाठी १६ कोटी ७१ लाख १४ हजार रूपयांचा कृती आराखडा तयार केला होता़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांसाठी १० कोटी ७० लाख तर एप्रिल ते जूनसाठी १६ कोटी ७१ लाख १४ हजार रूपयांचा कृती आराखडा तयार केला होता़ त्यानुसार काही ठिकाणी कामेही सुरू करण्यात आले़ मात्र शासनाकडून अद्याप निधी न मिळाल्याने टंचाई निवारणार्थ अनेक कामे कागदावरच राहिली आहेत़ गतवर्षी पाणीटंचाई निवारणार्थ ७८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता़ प्रत्यक्षात ४३ कोटी ५० लाख रूपये विविध योजनांवर खर्च करण्यात आले़ यावर्षी नव्याने २७ कोटींची मागणी जिल्हा परिषदेने केली होती़ जिल्हाधिकारी कार्यालयात सादर झालेल्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तो विभागीय आयुक्तांकडे सादर झाला़ मात्र या आराखड्याचा प्रस्तावित निधी अद्याप मिळाला नाही़ मार्च, एप्रिल व मे महिन्यात ग्रामीण भागातील गावे, वाडे, वस्त्या पाण्यासाठी व्याकूळ झाले़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने मात्र कागदोपत्रीच आराखडे सादर करून आपले कर्तव्य बजावले़ ग्रामीण पाणीटंचाई निवारणार्थ जानेवारी ते जून या सहा महिन्यांसाठी २७ कोटींचा आराखडा तयार केल्यानंतर त्यास तातडीने निधी मिळण्यासाठीचे प्रयत्न अपुरे पडले़ त्यामुळे जिल्ह्यातील २२४ गावे, वाड्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागले़ गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचे गांभिर्य प्रशासनाकडून घेण्यातच आले नाही़ मार्चअखेर पाण्याचे स्त्रोत कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजनेचे कामे वेळेवर सुरू न झाल्यामुळे ऐन एप्रिलच्या मध्यावर पाणीटंचाईला सामोर जावे लागले़ ग्रामीण पाणीटंचाई निवारणार्थ सहा महिन्यांचा संभाव्य कृती आराखडा केला होता़ यामध्ये नवीन विंधन विहिरी, नळयोजना विशेष दुरूस्ती करणे, पुरक नळयोजना, विंधन विहीर विशेष दुरूस्ती, खाजगी विहीर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणी पुरवठा, प्रगतीपथावरील उपाय योजना आदी कामासाठी एकूण २७ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता़ एप्रिल ते जून या महिन्यासाठी १६ कोटी ७१ लाख १४ हजार रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता़