शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या पाणीटंचाईसाठी कृती आराखडा

By admin | Updated: December 22, 2015 02:02 IST

लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणार्थ पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता, त्यानुसार टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात आली,

नागपूर : लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणार्थ पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता, त्यानुसार टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात आली, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी विधानसभेत दिली. अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री केसरकर यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यासाठी १ आॅक्टोबर २०१४ ते ३० जून २०१५ या कालावधीकरिता ३१३८.१७ लक्ष रुपयाचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आलेला होता. तसेच जून २०१५ अखेर अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे १ जुलै २०१५ ते ३० सप्टेंबर २०१५ या कालवधीकरिता ६९२.८१ लक्ष रुपयांचा आकस्मिक टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता. टंचाई कृती आराखड्याची आवश्यकतेप्रमाणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत टंचाई निवारणार्थ एकूण १४६७ उपाययोजना राबवण्यात आल्या असून सदर उपाययोजनांवर १६१४.४९ लक्ष रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यापैकी शासनकडून आतापर्यंत १५४०.६१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे, असेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)