शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

धान्य न उचलणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2017 03:34 IST

स्वस्त धान्य आणि केरोसीन मिळण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आधार क्रमांक दुुकानदारांकडे नोंदविण्यास विरोध म्हणून चालू महिन्याच्या धान्याची उचल न करणाऱ्याचा निर्णय रास्त

पुणे : स्वस्त धान्य आणि केरोसीन मिळण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आधार क्रमांक दुुकानदारांकडे नोंदविण्यास विरोध म्हणून चालू महिन्याच्या धान्याची उचल न करणाऱ्याचा निर्णय रास्त धान्य दुकानदारांनी घेतला आहे. अशा दुकानदारांना शहर पुरवठा अधिकाऱ्यांनी (एफडीओ) नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. मुदतीत धान्य न उचलल्यास, जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांना देण्यात आला आहे. स्वस्त धान्य आणि केरोसिनचा काळाबाजार रोखण्यासाठी आधार क्रमांक असलेल्या शिधापत्रिकाधारकांनाच केरोसिन-धान्य देण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यापासून या अध्यादेशाची काटेकोर अंमलबजावणी शहर पुरवठा विभागाने सुरू केली. शिधापत्रिकाधारक कुटुंबातील ज्या सदस्यांचे आधार क्रमांक नाहीत त्यांच्या नावे दिले जाणारे धान्य राखून ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी आधार क्रमांक दुकानदारांकडे नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले. आधार क्रमांकाची नोंद केल्यानंतर राखून ठेवलेले धान्य आणि केरोसिन संबंधित शिधापत्रिकाधारकाला पुढील महिन्यात वितरित करण्यात येणार होते. त्यासाठी ३१ डिसेंबर ही मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, दुकानदारांनी त्याला विरोध सुरू केला. धान्याचे कमिशन परवडत नाही. दुकानभाडे, वीजबिल व कामगारांचा पगार भागविणे शक्य होत नसल्याची भूमिका घेत, कमिशन वाढवून दिल्याशिवाय धान्याची उचल करणार नसल्याचे जाहीर केले. त्यानुसार चालू जानेवारी महिन्याचे धान्य आणि केरोसिन न उचलणाऱ्या दुकानदारांना शहर पुरवठा विभागाकडून नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. चालू महिन्याच्या धान्याची उचल करून २५ तारखेपर्यंत लाभार्थ्यांना वितरित करा; अन्यथा परवाना रद्द करून जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याच्या सूचना परिमंडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवार यांनी सांगितले.