शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित कंपन्यांवर कारवाई

By admin | Updated: October 18, 2016 05:37 IST

एकाच उत्पादनाच्या दोन वेगवेगळ्या किमती छापून त्याची मॉल व दुकानांमधून विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले

मुंबई : एकाच उत्पादनाच्या दोन वेगवेगळ्या किमती छापून त्याची मॉल व दुकानांमधून विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर पॅकबंद पाणी वेगवेगळ्या किमतीला विकणाऱ्या हिंदुस्थान कोकाकोला (किनल) पेप्सीको (अ‍ॅक्वाफिना), रेडबूल इंडिया (रेडबूल), युरेका फोर्ब्स (अ‍ॅक्वाशुअर), पिटेल्स अ‍ॅक्वा आणि अ‍ॅग्रो फूडस् या कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या प्रकरणी राज्यातील ३४५ दुकानांची तपासणी करून १३४ दुकानांवर खटले दाखल केल्याचे वैध मापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक तथा विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. याशिवाय, एकाच उत्पादनाच्या दोन वेगवेगळ्या किमती छापून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या मुंबईतील सिनेमा व्हेंचर्स प्रा. लि., मेट्रो मेनलाईन, आयनॉक्स लेसर, नरिमन पॉइंट येथील आर टू मॉल, सुवर्णा फिल्म एंटरप्रायजेस, एरॉस थिएटर, फिनिक्स मिल कपाउंडमधील पी. व्ही. आर. फिनिक्स, चिंचपोकळीतील जयहिंद सिनेमा हॉल, कांदिवलीतील आॅरेंज हॉटेल रेस्टॉरंट, छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील बेकर्स स्ट्रीट, सांताक्रूज विमानतळ येथील शिवसागर व्हेज रेस्टॉरंट, मिलीयम एजन्सी प्रा. लि., अरायव्हल प्लाझा, द ग्रेट कबाब फॅक्टरी, घाटकोपर येथील आयनॉक्स टॉकिज व आरसिटी मॉल, नील स्क्वेअर मॉल, एलबीएस मार्ग येथील कार्निव्हल कंपनी प्रा. लि. या आस्थापनांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील खारघर येथील सिनेमा व्हेंच्युरी, पीव्हीआर, पनवेलमधील ओरयान मॉल, अप्पार क्रस्ट फूडस्प्रा. लि., ओरियान मॉल, खालापूर येथील एडलॅब्स एंटरटेनमेंट लि. आणि पुण्यातील बंडगार्डन येथील आयनॉक्स लेजर, हडपसर येथील सिनेपोलीस सिझन मॉल्स, मगरपट्टा येथील आयनॉक्स अमनोरा मॉल्स तसेच नागपूरमधील व्हरायटी स्क्वेअर येथील सफायर फूड प्रा. लि. यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)>कंपनीला बजावली नोटीसबाटलीबंद पाणी विकणाऱ्या हिंदुस्थान कोकाकोला, पेप्सीको इंडिया होल्डिंग, रेडबूल इंडिया आणि युरेका फोर्ब्स या नामांकित कंपन्यांनी एकसमान आकाराच्या बाटल्यांी वेगवेगळ्या किंमतीने विक्री केल्याचे उघडकीस आल्याने या कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.