शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पक्षादेश झुगारणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: May 17, 2016 04:30 IST

विरोधी पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यास कारणीभूत ठरलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक परशुराम म्हात्रे यांना पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी कारणे दाखवा नोटीस

 

राजू काळे,

भार्इंदर- प्रभाग समिती सभापती निवडणुकीवेळी अनुपस्थित राहून विरोधी पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यास कारणीभूत ठरलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक परशुराम म्हात्रे यांना पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे.पक्षाने कोणतीही कारवाई न करता त्यांना मोकाट सोडल्याचे वृत्त लोकमतच्या हॅलो ठाणे पुरवणीत १५ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी म्हात्रे यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला आहे. म्हात्रे यांना सोमवारी (१६ मे) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे गटनेते बर्नड डिमेलो यांनी सांगितले. २९ एप्रिलच्या प्रभाग समिती सभापती निवडणुकीत प्रभाग १ ते ५ मधील काही निवडणुका बिनविरोध, तर काही पक्षीय बलाबलानुसार पार पडल्या. प्रभाग ६ मध्ये मात्र राष्ट्रवादीचे ९, भाजपाचे ५, सेनेचे २ व बहुजन विकास आघाडीचे २ सदस्य असल्याने सेना-भाजपा युतीचे मिळून ७ तर बविआच्या २ सदस्यांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने दोन्ही बाजूंकडील सदस्यसंख्या प्रत्येकी ९ झाल्याने येथील निवडणूक चमत्कारिक ठरणार होती. दोन्ही बाजूंकडून राष्ट्रवादी व भाजपाच्या उमेदवारांना समान मतदान झाल्यानंतर लॉटरी काढण्यात येणार, हे जवळपास ठरले होते. परंतु, नेहमीप्रमाणे या प्रभाग समितीअंतर्गत प्रभाग ४० मधील राष्ट्रवादीचे नगसेवक परशुराम म्हात्रे यांनी पक्षादेश असतानाही निवडणुकीला उपस्थित राहणे टाळले. याबात त्यांनी वरिष्ठांना कोणतीही पूर्वसूचना न देताच थेट भाजपाचे आ. नरेंद्र मेहता यांच्याशी हातमिळवणी केल्याचा आरोप पक्ष पदाधिकाऱ्यांनी करण्यास सुरुवात केली. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या उमेदवार दक्षता ठाकूर यांना विजयी करण्यासाठी माजी खा. संजीव नाईक यांच्यासह विरोधी पक्ष नेते लियाकत शेख यांनी जोरदार फिल्डिंग लावली. परंतु, ऐन निवडणुकीवेळी शब्द दिलेल्यांनी विरोधात मतदान केल्यामुळे ठाकूर यांचा पराभव झाला. त्यातच म्हात्रे यांची बंडखोरी पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागल्यानंतरही पक्षाने म्हात्रे यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत म्हात्रे यांच्यावरील कारवाईचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पक्षातील लोकांची नाराजी उफाळून आल्यानंतरही पक्षाला कारवाईची आठवण न झाल्याने पक्षात विरोधाभास निर्माण होऊ लागला.