शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एकापेक्षा अधिक सदनिका हडपणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: December 23, 2015 01:32 IST

मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार सदनिका कोट्यातून दोन किंवा त्यापेक्षा अधिक सदनिका हडपणाऱ्यांवर व दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाईस सुरुवात केली आहे,

मुंबई : मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार सदनिका कोट्यातून दोन किंवा त्यापेक्षा अधिक सदनिका हडपणाऱ्यांवर व दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाईस सुरुवात केली आहे, अशी माहिती मंगळवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली. ‘मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून दोन किंवा त्यापेक्षा अधिक सदनिका लाटणाऱ्यांवर आणि दोषी अधिकाऱ्यांवर २१ जानेवारी २०१६पर्यंत कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत,’ अशी माहिती सरकारी वकील एफ.आर. शेख यांनी न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाला दिली. या घोटाळ्याची चौकशी करण्याकरिता उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या जे.ए. पाटील यांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसारच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे अ‍ॅड. शेख यांनी खंडपीठाला सांगितले. दोन किंवा त्यापेक्षा अधिक सदनिका असलेल्यांकडून तातडीने सदनिकांचा ताबा घ्यावा. त्यांनी जर सदनिका विकल्या असतील तर त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याची शिफारस पाटील यांच्या समितीने अहवालाद्वारे केली आहे. सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. कलाकार, स्वातंत्र्यसैनिक, खेळाडू इत्यादींसाठी असलेल्या सदनिका नेते व त्यांचे नातेवाईक आणि पत्रकारांनी हडपल्याचा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला आहे. खंडपीठाने राज्य सरकारला २५ जानेवारीपर्यंत कारवाईसंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश देत या याचिकेवरील सुनावणी ३० जानेवारी रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)