शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

नोव्हेंबरपर्यंतची ‘एफआरपी’ न दिल्यास कारखान्यांवर कारवाई

By admin | Updated: January 24, 2015 01:44 IST

उसास किफायतशीर व वाजवी दर (एफआरपी) न देणाऱ्या राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांची साखर गोदामे ३१ जानेवारीनंतर जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत,

कोल्हापूर : नोव्हेंबर अखेरपर्यंत गाळप झालेल्या उसास किफायतशीर व वाजवी दर (एफआरपी) न देणाऱ्या राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांची साखर गोदामे ३१ जानेवारीनंतर जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी दिली. त्यामुळे २६ जानेवारीला पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचे आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे, परंतु संबंधित पालकमंत्र्यांना संघटनेचे कार्यकर्ते त्यादिवशी निवेदन देऊन एफआरपी देण्याची मागणी करतील, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, आम्ही कारखानदारांना २६ जानेवारीची अखेरची मुदत दिली होती, परंतु आंदोलनाचा धसका घेऊन साखर आयुक्तांनी जिल्हानिहाय बैठका सुरू केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यांतील कारखानदारांची बैठक त्यांनी गुरुवारी घेतली आहे. नोव्हेंबरअखेर गाळप झालेल्या उसाचे बिल एफआरपीनुसार देण्यात येईल, असे संचालक मंडळांकडून लिहून घेण्यात येत आहे. जे कारखाने एफआरपीनुसार बिले देणार नाहीत त्यांची साखर गोदामे महसुली थकबाकीची वसुली कायद्यान्वये ३१ जानेवारीनंतर सील केली जातील, असे त्यांनी कारखानदारांना सांगितले आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना एफआरपीनुसार बिले मिळू शकतील.साखर आयुक्तांनी दिलेल्या डेडलाईननुसार जे कारखाने एफआरपी देणार नाहीत, त्यांच्याविरोधात संघटना फेब्रुवारीत आक्रमक आंदोलन करेल, असेही शेट्टी यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ‘एफआरपी’ची डेडलाईन३० नोव्हेंबरपर्यंतचे गाळप : ३१ जानेवारीडिसेंबरपर्यंतचे गाळप : १५ फेब्रुवारीजानेवारीपर्यंतचे गाळप : २८ फेब्रुवारी