शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उलवेतील अतिक्रमणावर कारवाई

By admin | Updated: April 29, 2016 03:23 IST

उलवे नोडमधील शेलघर गावात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर सिडकोने बुधवारी धडक कारवाई केली.

नवी मुंबई : उलवे नोडमधील शेलघर गावात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर सिडकोने बुधवारी धडक कारवाई केली. हे बांधकाम हॉटेलसाठी उभारले जात होते. परिसरात बेकायदा बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.उलवे येथील अशोक के. घरत यांनी उभारलेल्या या बांधकामाला सिडकोच्या अतिक्रमण विभागाने रीतसर एमआरटीपी कायद्यांतर्गत नोटीस बजावली होती. घरत यांनी या नोटिसीला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दोन्ही बाजूंची सुनावणी झाल्यानंतर आवश्यक असलेली विकास परवानगी प्राप्त न झाल्यास ९० दिवसांच्या आत आपण स्वत: हे बांधकाम निष्कासित करू असे प्रतिज्ञापत्र घरत यांनी न्यायालयात सादर केले होते. परंतु त्यांनी असे न केल्याने सिडकोने बुधवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात हे बांधकाम पाडून टाकले. दरम्यान, या कारवाईत अडथळा आणण्याचे प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आले. अनधिकृत बांधकाम स्थळावर जात असताना मुख्य रस्त्यावर ३० फूट खोलीचा खड्डा खोदून ठेवला होता. तसेच रस्त्याच्या मधोमध मोठमोठे दगड ठेवून कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे स्थानिक गावकऱ्यांनीदेखील मोठ्या प्रमाणात विरोध केला. परंतु सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कोणताही अडथळा व विरोध न जुमानता दुपारी १.३० ते संध्याकाळी ५.३० या कालावधीत सदर बेकायदा इमारत जमीनदोस्त केली. (प्रतिनिधी)