शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण वाढल्यास सीईओंवर कारवाई

By admin | Updated: March 23, 2017 23:52 IST

राज्यातील सात सर्वाधिक प्रदूषित एमआयडीसींमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे काम राज्य शासन स्वत: हाती घेईल. त्यानंतरही प्रदूषणाची

मुंबई : राज्यातील सात सर्वाधिक प्रदूषित एमआयडीसींमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे काम राज्य शासन स्वत: हाती घेईल. त्यानंतरही प्रदूषणाची पातळी वाढली तर संबंधित एमआयडीसीच्या मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत सांगितले. अतुल भातखळकर आदींनी राज्यातील औद्योगिक प्रदूषणासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. शहरांमधील वायुप्रदूषण रोखण्यासाठी सरकार काय पाऊल उचलत आहे, असा प्रश्न करून त्यांनी प्रदूषण नियंत्रणाचे प्रभावी काम करणाऱ्या संस्था, कंपन्यांना कार्बन क्रेडिट द्यावे, अशी सूचनाही केली. प्रदूषण नियंत्रणाचा कृती आराखडा लवकरात लवकर अंमलात आणण्यात येईल, असे पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी सांगितले. अतुल सावे यांनी औरंगाबाद येथील डिस्टिलरीजच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे याकडे लक्ष वेधले. या कारखान्यांविरुद्ध आठ दिवसांच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले. वीटभट्ट्यांमार्फत होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी धोरण तयार करण्यात आले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन कदम यांनी दिले.