शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

युसूफ मेहरअली मार्गावर पुन्हा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 06:57 IST

मशीद रेल्वेस्टेशन येथील युसूफ मेहरअली मार्गावरील अतिक्रमणे व अनधिकृत फेरीवाले यांच्याविरोधात कारवाई सुरू असताना यापूर्वी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मशीद रेल्वेस्टेशन येथील युसूफ मेहरअली मार्गावरील अतिक्रमणे व अनधिकृत फेरीवाले यांच्याविरोधात कारवाई सुरू असताना यापूर्वी विरोध झाला होता. ही बाब लक्षात घेत महापालिकेने आता या मार्गावर राज्य राखीव पोलीस दलाच्या व मुंबई पोलीस दलाच्या मदतीने कारवाई केली. कारवाईदरम्यान युसूफ मेहरअली मार्गावरील ९० अनधिकृत फेरीवाले/वाढीव बांधकामे हटविण्यात आली. पी. डीमेलो मार्गाच्या पदपथावरील १५ झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. परिणामी, येथील पदपथ मोकळा झाला आहे.मशीद स्टेशनजवळ असणाऱ्या युसूफ मेहरअली मार्गावर अनधिकृत फेरीवाल्यांचा उपद्रव वाढल्याच्या आणि त्यामुळे या मार्गावर वाहतूककोंडी होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या. त्यानुसार या मार्गावरील अतिक्रमणे/अनधिकृत बांधकामे हटविण्याची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. यानुसार करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान महापालिकेच्या पथकाला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दुकानदारास मुंबई पोलिसांनी अटक केली होती. कारवाईदरम्यान एकूण ९६ अनधिकृत फेरीवाले/वाढीव बांधकामे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.याच रस्त्यावर नुकतीच दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली. यापूर्वी झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य राखीव पोलीस दल व मुंबई पोलीस दल यांचे विशेष सहकार्य घेत, या परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर/अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार या मार्गावर नुकतीच दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आणि हा रस्ता मोकळा करण्यात आला. या कारवाईदरम्यान साधारणपणे ९० अनधिकृत फेरीवाल्यांवर/वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच कर्नाक बंदर पुलाजवळील पी. डीमेलो मार्गाच्या पदपथावरील १५ झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे पदपथ मोकळा झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे सुलभ होण्यासोबतच रस्त्यावरील पादचाऱ्यांची संख्या कमी झाल्याने वाहतूक वेगवान होण्यास मदत होणार आहे.कारवाईसाठी राज्य राखीव पोलीस दलाचे सुमारे ३० जवान, मुंबई पोलीस दलातील २० कर्मचारी हे कारवाईस्थळी कार्यरत होते. महापालिकेच्या पथकामध्ये सुमारे ३० कामगार-कर्मचारी-अधिकारी कार्यरत होते. तसेच या कारवाईदरम्यान १ जेसीबी, १ ट्रक, अतिक्रमण विभागाच्या २ गाड्या इत्यादी यंत्रसामुग्री व वाहने वापरण्यात आली. या परिसरातील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे यांच्या विरोधातील कारवाई यापुढेही नियमितपणे सुरू राहील.- उदयकुमार शिरुरकर, सहायक आयुक्त, बी विभाग, मुंबई महापालिका