शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

भुजबळांच्या नाशिकमधील फार्महाऊसवर एसीबीकडून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2016 15:07 IST

ऑर्थर रोड जेलमध्ये कैदेत असलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांच्या नाशिकमधील अलिशान फार्म हाऊसवर एसीबीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे

- ऑनलाइन लोकमत 
नाशिक, दि. 22 -  गेल्या काही महिन्यांपासून ऑर्थर रोड जेलमध्ये कैदेत असलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांच्या नाशिकमधील अलिशान फार्म हाऊसवर जप्तीची कारवाई करण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (एसीबी) ही  कारवाई केली आहे. एसीबीचं पथक भुजबळ फार्मवर दाखल झालं असून मोजमाप आणि व्हॉल्युएशनचं काम सुरु आहे अशी माहिती मिळाली आहे. मात्र ही जप्तीची कारवाई नसल्याचा दावा भुजबळ कुटुंबिय करत आहेत.
 
(छगन भुजबळ नाशिकमधून बेघर, एकमेव निवाराही जप्त)
 
नाशिकमधील गोविंदनगर भागात भुजबळांचं फार्महाऊस आहे. फार्म हाऊसवर ईडीचं पथक दाखल झालं असून फार्मचं मोजमाप करण्याचं काम सुरु आहे. 
 
(ईडीने दिलेले मेडिकल रिपोर्ट माझे नाहीत - भुजबळ)
 
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी भुजबळ व कुटुंबीयांच्या मुंबई, नाशिक व अहमदनगरमधील विविध २२ स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईत नाशिकमधल्या आलिशान फार्म हाऊसवरही जप्ती आणण्यात आली . नाशिकमधील औद्योगिक जमीन, वायनरी प्रकल, द्राक्षांच्या बागा यांच्यासह भुजबळ फार्म हाऊसवरही कारवाई करण्यात आली.  
 
(भुजबळांच्या ९० कोटींवर टाच!)
 
भुजबळ फार्ममधील साडेतीन एकर जागा ही भुजबळांची वडिलोपार्जित जागा आहे, तर उर्वरित जागा त्यांनी नव्याने विकत घेऊन त्यावर आलिशान महाल उभा केला आहे. हा महाल व त्यांच्या कार्यालयाची जागा जप्त केली असून हे बेहिशेबी पैशांतून बांधल्याचा ईडीचा आरोप आहे. भुजबळांचा नाशिकमधील एकमेव निवाराही जप्त झाल्याने भुजबळ नाशिकमधून बेघर झाल्याची चर्चा आहे. 
ईडीने केलेल्या कारवाईमधील मालमत्तांची एकूण किंमत सुमारे ९० कोटी असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अशा प्रकारे आत्तापर्यंत ‘ईडी’ने जप्त केलेल्या भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तांचे मूल्य आता ४३३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. माजी मंत्री छगन भुजबळ व त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ गेल्या काही महिन्यांपासून ऑर्थर रोड कारागृहात आहेत. या प्रकरणी भुजबळांचे पुत्र व राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ यांना उच्च न्यायालयाने नुकताच अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 
 
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी विविध कंपन्यांच्या संगनमताने आर्थिक गैरव्यवहार करत कोट्यवधींची मालमत्ता गोळा केल्याचा ‘ईडी’ने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा, मुंबईतील कलिनातील भूखंड घोटाळ्यातून हा अपहार केल्याचा ईडीचा दावा आहे.
सक्तवसुली संचालनालयाने ३० मार्चला न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये भुजबळ पिता पुत्र व पुतण्याशिवाय, डीबी रिअ‍ॅलिटी, बलवा ग्रुप, नील कमल रिअ‍ॅलटर्स अँड बिल्डर्स, नीलकमल सेंट्रल अपार्टमेंट, एलएलपी आणि काकडे इन्फ्रास्ट्रक्चर्स या कंपन्यांचा समावेश आहे. 
 
भुजबळ साडेसहा महिने कोठडीत
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भुजबळ कुटुंबियांच्या पाठीमागे कारवाईचा ससेमिरा लागला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व ईडीने मनी लॉन्ड्रिंग, महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणाचा तपास शिताफीने केला. यावर्षीच्या सुरवातीला पहिल्यांदा समीर भुजबळ यांना अटक करण्यात आली. त्यानंतर छगन भुजबळ यांनाही अटक झाली. गेल्या साडेसहा महिन्यांपासून ते कोठडीत आहेत.