शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस दिव्यांगांच्या आजीवन आश्रयासाठी लवकरच कायदा : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

By admin | Updated: April 30, 2017 13:22 IST

मतीमंद, दिव्यांग मुले-मुली वयात आल्यानंतरही त्यांचा कायद्याने सांभाळ करता यावा व त्यांना आश्रय मिळावा, यासाठी कायदा करण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केली.

 जळगाव,दि.30- मतीमंद, दिव्यांग आणि प्रज्ञाचक्षू मुले-मुली ही वयात आल्यानंतरही त्यांचा कायद्याने सांभाळ करता यावा व त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळून आश्रय मिळावा, यासाठी लवकरच कायदा करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी रविवारी जळगावात केली. या वेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हेदेखील उपस्थित होते. त्यांनीही असे प्रस्ताव सर्व राज्यातून येण्यासाठी प्रयत्न केली जातील, अशी ग्वाही दिली. 

20 वषार्पूर्वी शिर्डी येथे बेवारस स्थितीत सापडलेल्या व अमरावती जिल्ह्यातील वङझर येथील स्व.अंबादासपंत वैद्य, दिव्यांग, बेवारस बालगृहात समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या देखरेखीत वाढलेली 20 वी मानसकन्या मंगल या  मुकबधीर मुलीच्या विवाहासाठी ते जळगावात आले होते. सकाळी शहरातील पद्मालय विश्रामगृह येथे  बडोले यांच्यासह हंसराज अहिर यांनी उपवरांना आशीर्वाद दिले. त्या वेळी ते बोलत होते. 
समाजातील बेवारस मतीमंद, दिव्यांग आणि प्रज्ञाचक्षू मुले मुली अल्पवयीन असताना त्यांचा बालसुधारगृह अथवा संस्थांमध्ये सांभाळ केला जातो, मात्र ती 18 वर्षाची झाली तर त्यांचा कायद्यानुसार सांभाळ करता येत नसल्याने ते वाईट मार्गाला लागतात अथवा त्यांचे हाल होतात.  त्यांना सुरक्षित जगण्यासाठी किंवा पोषण व निवासासाठी सरकारी योजना नाहीत. ती सुरू करायला हवी हा उद्देश डोळ्य़ापुढे ठेवून खास हा मंगल विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. त्या माध्यमातून अशा मुलांना आश्रय मिळण्यासाठी कायद्याने तरतूद व्हावी, अशी अपेक्षा शंकरबाबा पापळकर यांची असून यासाठी जळगावातील रोटरी क्लब जळगाव वेस्टनेही पुढाकार घेतला आहे.  
हा प्रश्न लक्षात घेऊन शंकरबाबा पापळकर यांच्यासह रोटरी क्लबच्यावतीने राजकुमार बडोले यांना निवेदन देण्यात आले. त्याला उत्तर देताना त्यांनी वरील घोषणा केली. सोबतच अशा मुलांच्या सांभाळासह त्यांच्या लग्नासाठी रोटरीप्रमाणे राज्यातील इतर संस्थांनीही पुढे आले पाहिजे असे सांगून रोटरी क्लब जळगाव वेस्टच्या या कार्याचे कौतुक केले. 
इतर राज्यांनीही पुढाकार घ्यावा
हंसराज अहिर यांनी या विषयी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच अपंगांसाठी ‘दिव्यांग’ शब्द लागू केला असून अशा मुलांच्या सांभाळासाठी प्रत्येक राज्याकडून प्रस्ताव मागविले जातील. बडोले यांच्याकडे हे खाते असून महाराष्ट्रात हा कायदा लागू होण्यासाठी त्यांनी तत्काळ प्रस्ताव पाठविल्यास केंद्राकडूनही सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.