शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात सापडले ७१६ गोण्या सोयाबीनचे अप्रमाणित बियाणे!

By admin | Updated: June 28, 2016 01:51 IST

कृषी विभागाने घातली विक्रीवर बंदी; कारवाई करणार असल्याचे सुतोवाच.

राजरत्न सिरसाट/अकोला अकोल्यात गुजरात व मध्य प्रदेशातील अप्रमाणित सोयाबीन बियाण्याची सर्रास विक्री होत आहे. हे बियाणे प्रमाणित (सर्टिफाय) नसल्याने शेतकर्‍यांची फसवणूक होत असून, याबाबत ह्यलोकमतह्णने पाठपुरावा करताच कृषी विभागाच्या पथकाने रविवारी रात्री उशिरापर्यंंंंत शहरातील दोन बियाणे विक्रे त्या प्रतिष्ठानाची कसून तपासणी केली. तपासणीत या पथकाला दोन्ही प्रतिष्ठानाच्या गोडावूनमध्ये मध्य प्रदेशातील अप्रमाणित सोयाबीन बियाण्याच्या ७१६ गोण्या आढळून आल्या. त्यामुळे कृषी विभागाने सोयाबीन बियाणे विक्रीवर तातडीने बंदी घातली आहे.विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात अप्रमाणित सोयाबीन व बीटी कापूस बियाणे आले असून, यातील काही बियाण्याची विक्री करण्याची परवानगी नसताना, गुजरात व मध्य प्रदेशातील बियाणे सर्रास विकले जात आहे. अकोल्यातील काही बियाणे विक्रेता प्रतिष्ठानांवरू न अप्रमाणित बियाण्याची विक्री होत असल्याने कृषी विभागाने शुक्रवारपासून तपासणी सुरू केली. शनिवारी केलेल्या तपासणीत अकोल्यातील दोन बियाणे विक्रेता प्रतिष्ठानच्या गोडावूनमध्ये अप्रमाणित बियाणे आढळले. या बियाण्यासंदर्भात कृषी विभागाच्या चमूने कागदपत्रांची तपासणी केली; परंतु त्या प्रतिष्ठानांना बियाणे कोठून प्रमाणित केले, हे अद्याप सिद्ध करता आले नाही. परप्रातांतील बियाणे तसे विकता येत नाही. त्यासाठी महाराष्ट्र शासनाची परवानगी असणे गरजेचे आहे, शिवाय प्रमाणीकरण (सर्टिफाय) केलेले बियाणे असावे. यासंबंधी कृषी यंत्रणेकडून कागदपत्राची चौकशी करण्यात आली; परंतु कोणतेच कागदपत्र न आढळल्याने अखेर ७१६ सोयाबीन बियाणे गोण्याची विक्री थांबविण्यात आली.- आतापर्यंंंत किती बियाणे विकले?यावर्षी पाऊस चांगला असल्याचे भाकीत हवामानशास्त्र विभागाने केल्याने शेतकर्‍यांनी सोयाबीन बियाणे खरेदी केले. त्यामुळे आतापर्यंंंंत असे किती बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारण्यात आले. हे तपासण्याचे आव्हान कृषी विभागापुढे निर्माण झाले आहे.शहरातील दोन बियाणे विक्रेता प्रतिष्ठानांच्या गोडावूनमधून ७१६ सोयाबीन बियाण्याच्या गोण्या आढळून आल्या. हे बियाणे प्रमाणित केलेले असल्याची कागदपत्रे मात्र आढळली नसल्याने रात्री उशिरा मध्य प्रदेशातील या सोयाबीन बियाण्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली, असल्याचे कृषी विभागाचे मिलिंद जंजाळ यांनी स्पष्ट केले.