शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अजिंक्यचा सातासमुद्रापार झेंडा

By admin | Updated: June 29, 2016 02:14 IST

सहा महिन्यांपूर्वी नृत्य दिग्दर्शकाचे धडे गिरवण्यासाठी गेलेल्या उरण तालुक्यातील बोकडविरा गावच्या अजिंक्य पाटील याने आऊटस्टँडिंग स्टुडंट पारितोषिक पटकावले आहे.

उरण : न्यूयॉर्क सिटीमधील ब्रॉडवे डान्स सेंटर संस्थेत सहा महिन्यांपूर्वी नृत्य दिग्दर्शकाचे धडे गिरवण्यासाठी गेलेल्या उरण तालुक्यातील बोकडविरा गावच्या अजिंक्य पाटील याने आऊटस्टँडिंग स्टुडंट पारितोषिक पटकावले आहे. उरणचे नाव सातासमुद्रापार पोहोचविण्याचा पराक्रम करणाऱ्या अजिंक्यवर मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अजिंक्य पाटील या उरण तालुक्यातील २५ वर्षांच्या तरुणाला आंतरराष्ट्रीय हॉलीवूडमध्ये ख्याती असलेल्या अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटीमधील ब्रॉडवे डान्स सेंटर संस्थेने नृत्य दिग्दर्शकाचे धडे गिरविण्यासाठी आमंत्रित केले होते. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी अजिंक्य पाच महिन्यांपूर्वी न्यूयॉर्क सिटीकडे गेला आहे. नृत्य प्रशिक्षणाची आवड असल्याने २०१० साली अजिंक्यने देशातील बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शामक डावर यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवले. प्रशिक्षणादरम्यान अजिंक्यने छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमातून नृत्याची छाप पाडली. त्यानंतर त्याने बोकडविरा येथे नृत्य प्रशिक्षण देणारी अ‍ॅकॅडमीही सुरू केली. अ‍ॅकॅडमीत नृत्याचे धडे देण्याबरोबरच मुंबई, नवी मुंबई, पनवेलमध्येही काही संस्थांमध्ये नृत्य प्रशिक्षणाचे धडे देणाऱ्या संस्थेतील विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन देण्याचेही काम केले. त्याचबरोबर झुंबा एरोबिक पद्धतीने नृत्याचे धडे देणाऱ्या संस्थेकडूनही अजिंक्यने मार्गदर्शक म्हणूनही काम केले.अजिंक्यच्या कलागुणांची पारख करून त्याला आंतरराष्ट्रीय हॉलीवूडमध्ये ख्याती असलेल्या अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटीमधील ब्रॉडवे डान्स सेंटर संस्थेने नृत्य दिग्दर्शकाचे धडे गिरविण्यासाठी आमंत्रित के ले होते. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणात अजिंक्यने नृत्य शिक्षक बोनी हरेक्सन आणि डेरेक मिशेल यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्याचे धडे गिरवले आणि जागतिक पातळीवरील प्रशिक्षणासाठी आलेल्या नृत्य कलाकारांमधून आऊटस्टँडिंग स्टुडंटचे पारितोषिक पटकावले. (वार्ताहर)