शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महिला विक्री प्रकरणातील आरोपीला तेल्हाऱ्यात अटक

By admin | Updated: July 29, 2016 19:56 IST

महिलेला परप्रातांत नेऊन विक्री केल्याप्रकरणातील एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने तेल्हारा तालुक्यातील दानापुरातून शुक्रवारी अटक केली.

ऑनलाइन लोकमत

अमरावती, दि. २९ : महिलेला परप्रातांत नेऊन विक्री केल्याप्रकरणातील एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने तेल्हारा तालुक्यातील दानापुरातून शुक्रवारी अटक केली. अब्दूल सलाम अब्दूल सत्तार (६५, रा. दानापूर, जि.अकोला) असे आरोपीचे नाव आहे. शहरातील एक महिला कॅटरर्सचे काम करीत असताना तिची आरोपी चंदू उईके याच्याशी नागपूरमध्ये ओळख झाली होती. चंदूने तिला गुजरातमध्ये चांगले काम देण्याचे आमीष दाखविले होते. त्यामुळे ती महिला चंदूसोबत ७ नोव्हेंबर २०१४ रोजी गुजरातला गेली होती. त्यानंतर वर्षभर ती महिला अमरावती परतली नव्हती.

दरम्यान चंदूने त्या महिलेला राजस्थान येथील प्रफुल्ल लंगडा याला विक्री केली. नाईलाजाने ती महिला वर्षभर प्रफुल्लसोबत राहिली. मात्र, त्यानंतर प्रफुल्लने त्या महिलेला तेल्हारा येथील अब्दूल सलामच्या घरी ठेवले. दोन महिने त्या सलामकडे राहिल्यात. मात्र, त्यानेही आणखी एका व्यक्तीला विक्री केली. हा प्रकार सुरू असताना पीडित महिलेने अमरावतीमधील हिन्दू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला.

त्यावेळी शहरातील काही हिन्दू संघटनेचे कार्यकर्ता महिलेची मदत करून तिची राजस्थान येथील मागीलाल लखाराम यांच्या घरातून सोडवणूक केली. महिलेच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी ५ एप्रिल २०१६ रोजी आरोपी चंदू उईके (रा.नागपूर), प्रफुल्ल लंगडा व उमेश दर्जी (गुजरात) या तिघांविरुध्द भादंविच्या कलम ३७६ (२)(एन), ३६६, ३७०, ४१७ अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणात पोलिसांनी चंदू उईकेला अटक केली होती व अन्य आरोपीचा शोध सुरूहोता. शुक्रवारी गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या शोधात तेल्हारा तालुक्यातील दानापूरकडे रवाना झाले होते. त्या आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. आयुक्तांच्या निर्देशानंतर तपासाला गतीशहर तपास संथगतीने सुरू असल्याचे पाहून पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यानी लक्ष घालून गुन्हे शाखेला निर्देश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल किनगे यांनी तत्काळ आरोपीचा मागोवा घेऊन त्याला अटक केली आहे.