आकोट (अकोला): सोमवारी झालेल्या विद्यार्थी खूनप्रकरणी आरोपीला पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले; मात्र त्याचे वय १७ वर्षे असल्याचे, अर्थात तो बालगुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाल्याने न्यायालयाने त्याची बालसुधारगृहात रवानगी केली. उत्तरपत्रिका दाखविण्यावरून दोन विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयातच मारहाण होऊन इयत्ता अकरावीच्या एका विद्यार्थ्याचा खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास आकोट येथील बाबू जगजीवनराम कनिष्ठ महाविद्यालयात घडली होती. इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका सोमवारी सकाळी महाविद्यालयातील शिक्षिकेने विद्यार्थी शुभम रमेश ढगे (१६) याला कार्यालयात ठेवण्यास सांगितल्या होत्या. तेवढय़ात त्याला एका विद्यार्थ्याने स्वत:ची उत्तरपत्रिका पाहण्यासाठी मागितली; मात्र शुभमने नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. या मारहाणीत शुभमच्या छाती व गुप्तांगाला जबर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून, मारहाण करणार्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले होते.
आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी
By admin | Updated: December 16, 2015 02:13 IST