शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीलाही कबुलीजबाब मिळवण्याचा अधिकार

By admin | Updated: June 25, 2016 03:29 IST

एकाच खटल्यामधील सहआरोपीच्या कबुलीजबाबाची प्रत मिळवण्याचा अधिकार आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने सीबीआयला शीना बोरा हत्येप्रकरणातील

मुंबई : एकाच खटल्यामधील सहआरोपीच्या कबुलीजबाबाची प्रत मिळवण्याचा अधिकार आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने सीबीआयला शीना बोरा हत्येप्रकरणातील आरोपी संजीव खन्ना याने दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले.शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी संजीव खन्ना याने इंद्राणी मुखर्जीचा आधीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने सीबीआयला दिलेल्या कबुलीजबाबाची प्रत मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती.सीबीआयच्या वकील पूर्णिमा कंथारिया यांनी यावर आक्षेप घेतला. खन्नाला श्यामवर रायच्या कबुलीजबाबाची प्रत आता देणे शक्य नसल्याचे अ‍ॅड. कंथारिया यांनी न्या. जाधव यांना सांगितले. ‘आम्ही त्याला कबुलीजबाबाची प्रत नंतर देऊ. आता तपास सुरू आहे. आरोपपत्र दाखल केल्यानंतर रायने कबुलीजबाब दिला आणि काही दिवसांपूर्वीच त्याला माफीचा साक्षीदार म्हणून जाहीर करण्यात आले आहे,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. कंथारिया यांनी केला.‘खटल्यातील सहआरोपीचा कबुलीजबाब किंवा साक्षीदाराच्या साक्षीची प्रत मिळविण्याचा आरोपीचा अधिकार आहे. कारण संबंधित कबुलीजबाब किंवा साक्ष खटल्यात पुरावा म्हणून सादर केली जाणार असते,’ असे निरीक्षण न्या. जाधव यांनी नोंदवले.खन्नाच्या अर्जावर उत्तर देण्यासाठी न्या. जाधव यांनी सीबीआयला एका आठवड्याची मुदत देत या याचिकेवरील पुढील सुनावणी ३० जून रोजी ठेवली.रायच्या कबुलीजबाबाची प्रत मिळावी, यासाठी खन्ना याने सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळल्याने त्याने उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले. (प्रतिनिधी)