शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘फेसबुक’वरून शोधला दंगलीचा आरोपी

By admin | Updated: January 11, 2017 05:18 IST

मुंबईतील १९९३ सालच्या दंगलीतील फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात रविवारी जोगेश्वरी पोलिसांना यश आले. हा आरोपी गेली १० वर्षे पोलिसांच्या हातावर तुरी देत होता

गौरी टेंबकर-कलगुटकर / मुंबईमुंबईतील १९९३ सालच्या दंगलीतील फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात रविवारी जोगेश्वरी पोलिसांना यश आले. हा आरोपी गेली १० वर्षे पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. महत्त्वाचे म्हणजे आरोपीच्या मुलाच्या ‘फेसबुक’ अकाउंटवरून पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधत त्याला गजाआड केले असून, रवींद्र सावंत उर्फ विठोबा सावंत (५०) असे आरोपीचे नाव आहे.विठोबा या नावाने तो भार्इंदरमधील ‘मोरक्को टॉवर’मध्ये पत्नी आणि मुलासह राहत होता. त्याने याच नावाने बनावट कागदपत्रे तयार करत एका नामांकित बँकेत खाते खुले केले होते. शिवाय एका खासगी विकासकाकडे वेषांतर करून काम करत होता. १९९३ सालच्या दंगलीत जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड परिसरात त्याने एक घर जाळले होते. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. त्याच्यावर न्यायालयात खटला चालवण्यात येत असताना सुरुवातीची काही वर्षे त्याने न्यायालयात हजेरी लावली. मात्र १० वर्षांपूर्वी तो पसार झाला.मुंबई उच्च न्यायालयाने फरार आरोपींना शोधण्याचे आदेश  पोलिसांना दिले होते. त्या आदेशान्वये पोलीस सावंतचा शोध घेत होते. जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण यादव यांना सावंतच्या मुलाचे ‘फेसबुक’ अकाउंट सापडले. याद्वारे त्यांनी त्याचा भार्इंदरचा पत्ता शोधत त्याच्या घराजवळ सापळा रचला. मात्र याची कुणकुण सावंतला लागली आणि तो घरातून पसार झाला. तरीही यादव यांनी शिताफीने सावंतचा पाठलाग करत भार्इंदर रेल्वे स्थानकावरून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला बारा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.