शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बारबाला हत्याप्रकरणी दीड वर्षाने आरोपी सापडला

By admin | Updated: November 30, 2015 03:11 IST

सोनी रॉय या बारबालेच्या हत्येप्रकरणी फरार आरोपी आणि तिचा पती दिलीप याला तब्बल दीड वर्षाने कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने बंगळुरू येथून जेरबंद केले आहे

कल्याण : सोनी रॉय या बारबालेच्या हत्येप्रकरणी फरार आरोपी आणि तिचा पती दिलीप याला तब्बल दीड वर्षाने कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने बंगळुरू येथून जेरबंद केले आहे. कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात आरोपीला सुपूर्द करण्यात आले आहे.पश्चिमेकडील एका बारमध्ये एकत्र काम करणारे सोनी आणि दिलीप हे पूर्वेतील खडेगोळवली परिसरातील गणेश कॉलनीत वास्तव्याला होते. ४ मे २०१४ या दिवशी सकाळी तिची बहीण रीतू घरी आली असता तिला सोनीचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रीतूकडे चौकशी केली असता दिलीप हा सोनीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यातून त्यांची वारंवार भांडणे व्हायची, अशी माहिती समोर आली होती. या घटनेनंतर दिलीप फरार झाल्याने त्यानेच ही हत्या केली, असा अंदाज पोलिसांनी बांधला होता. रीतूच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. स्थानिक कोळसेवाडी पोलिसांसह कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत होते. यात गुन्हे अन्वेषण विभागाला दीड वर्षानंतर यश आले असून आरोपी दिलीपला अटक करून कोळसेवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक विजय खेडकर आणि चिवड शेट्टी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (प्रतिनिधी) सोनी ही शशी नामक व्यक्तीबरोबर राहात होती. ते दोघेही दिलीप राहत असलेल्या घराजवळच वास्तव्यास होते. ‘तुला दुसऱ्यासोबत राहायचे असेल तर माझ्यापासून दूर जा’, असे अनेकदा दिलीपने सोनीला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने त्याचे ऐकले नाही. यातून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. १ मे ला महाराष्ट्र दिनानिमित्त बार बंद असल्याने सोनी ही घरी होती. शशी नसल्याचा फायदा घेऊन दिलीप घरात घुसला. यावेळी झालेल्या वादात त्याने सोनीचा गळा आवळून तिची हत्या केली.