बडनेरा (जि़ अमरावती) : अपहरण व चोरी प्रकरणातील आरोपीला नेताना त्याने धावत्या रेल्वेतून बेडय़ांसह पोबारा केल्याची घटना मंगळवारी सकाळी 6.30 वाजता बडनेरा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर घडली.
राहुल अरुण शेंडे (26, रा. वरोरा, जि. वर्धा) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध वर्धेच्या हिंगणघाट व पुणो जिलतील देवरोड पोलिसात अपहरण आणि चोरीच्या गुनंची नोंद आहे. सध्या तो वर्धा जिल्हा कारागृहात होता.
पुण्याच्या अपहरण प्रकरणात त्याची न्यायालयात सोमवारी हजेरी होती. यासाठी वर्धा पोलीस त्याला घेऊन पुण्यात रेल्वेने गेले होते. तेथून रात्रीला ते पुणो-नागपूर गरीब रथ या रेल्वेनेच वर्धेकडे निघाले होते. त्याच्यासोबत सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष नेहरे व जमादार रामचंद्र गेडाम या दोन बंदूकधारी गार्डचा समावेश होता़
रेल्वे बडनेरा स्थानकाच्या काही अंतरावर असतानाच राहुलने शौचास नेण्याची विनंती केली. पोलिस राहुलला बेडय़ांसह प्रसाधनगृहात नेत असतानाच राहुलने हाताला झटका मारुन धावत्या रेल्वेतून उडी घेतली. रेल्वे बडनेरा स्थानकावर थांबताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याचा प्रय} केला. परंतु तो न सापडल्याने वर्धा पोलिसांनी बडनेरा रेल्वे पोलिसांत तक्रार दिली़ (प्रतिनिधी)