शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षेच्या उमेदवाराला जालन्यात जिवंत जाळले, आर्थिक व्यवहारातून हत्या झाल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:48 IST

शासकीय सेवेसाठीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा उमेदवार अनंत श्रीकांत इंगोले (२८) यास हातपाय बांधून रविवारी मध्यरात्री जालन्यातील शहागड-पाथरवाला रस्त्यावर जिवंत जाळण्यात आले. २१ लाखांच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचे त्याच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. तो बीड जिल्ह्यातील सामनापूर येथील रहिवासी होता.

शहागड (जि. जालना) : शासकीय सेवेसाठीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा उमेदवार अनंत श्रीकांत इंगोले (२८) यास हातपाय बांधून रविवारी मध्यरात्री जालन्यातील शहागड-पाथरवाला रस्त्यावर जिवंत जाळण्यात आले. २१ लाखांच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचे त्याच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. तो बीड जिल्ह्यातील सामनापूर येथील रहिवासी होता.अनंत हा औरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. रविवारी सायंकाळी धुमाळ (पूर्ण नाव कळालेले नाही) व अन्य दोघांसोबत कारने घरी येत असल्याचे त्याने नातेवाइकांसह ग्रामसेवक मित्र तुकाराम घोलप यांना सांगितले होते. त्यामुळे रात्री साडेनऊ वाजता घोलप यांनी त्याला फोन केला तेव्हा पाचोडजवळ ढाब्यावर जेवत असल्याचे त्याने सांगितले. रात्री बारा वाजता घोलप यांनी पुन्हा संपर्क साधल्यानंतर त्याने वाहनातील लोकांकडून माझ्या जिवाला धोका असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याशी संपर्क झाला नाही.रात्री दीड वाजता साखर कारखान्याच्या सुरक्षारक्षकाला एका व्यक्तीला पेटविल्याचे दिसले. त्याने गोंदी पोलिसांना कळविले. पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन आग विझवली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अनंतची ओळख मृतदेहाजवळ सापडलेल्या कागदपत्रावरून पटली. अनंतचे पदुव्यत्तर शिक्षण झाले होते. तो वासनवाडी (जि. बीड) येथील ग्रामपंचायत कार्यालयात आॅपरेटर होता. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्याने औरंगाबादला खासगी शिकवणी लावली होती.घटनेपूर्वी भावाला एसएमएसघटनेपूर्वी मोठा भाऊ गोविंद यास अनंतने एसएमएस करून धुमाळ व अन्य एक व्यक्तीकडून मला २१ लाख रुपये मिळणार आहेत. मात्र, त्यांचे वर्तन ठीक नसून माझ्या जिवाला धोका असल्याचे कळविले होते.

टॅग्स :Murderखून