शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उपचारांसाठी आणलेला आरोपी पसार

By admin | Updated: August 6, 2016 05:20 IST

अमलीपदार्थांच्या गुन्ह्यांत शिक्षा झालेल्या आरोपीने योजनाबद्ध पद्धतीने जे. जे. रुग्णालयातून पळ काढल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली.

मुंबई : अमलीपदार्थांच्या गुन्ह्यांत शिक्षा झालेल्या आरोपीने योजनाबद्ध पद्धतीने जे. जे. रुग्णालयातून पळ काढल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली. मात्र पोलिसांनीही चपळाईने अवघ्या तीन तासांत आरोपीचा माग काढत त्याला अटक केली. मोहम्मद शेख असे आरोपीचे नाव आहे.भायखळा परिसरात राहणाऱ्या शेखला २ आॅगस्ट रोजी नागपाडा पोलिसांनी अमलीपदार्थाच्या गुन्ह्यात अटक केली. या गुन्ह्यात त्याला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आर्थर रोड कारागृहात त्याला ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पोटात दुखत असल्याचे नाटक त्याने केले. त्यानंतर नायगावच्या सशस्त्र पोलीस दलातील दोन पोलिसांसोबत त्याला सकाळी साडे दहाच्या सुमारास जे. जे. रुग्णालयात आणण्यात आले. त्याचदरम्यान केसपेपर काढण्यासाठी मोठी रांग असल्याने त्यांना बराच वेळ थांबावे लागले. याच गर्दीचा फायदा घेत साडे बाराच्या सुमारास शेखने तेथून पळ काढला. पोलिसांच्या हातावर फटका मारत तो बाहेर निसटला. कपडे बदलून तो तेथीलच एका फुटपाथवर लपून बसला होता.बराच शोध घेऊनही शेखचा थांगपत्ता न लागल्याने तासाभराने याची माहिती जे. जे. मार्ग पोलिसांना मिळाली. त्यानुसार, परिमंडळ १चे उपायुक्त मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उद्धवराव करंडे यांच्या नेतृत्वाखील तीन पथके बनविण्यात आली. या तपास पथकांपैकी पोलीस निरीक्षक उमेश कदम आणि पीएसआय प्रवीण फडतरे यांच्या पथकाला शेखला अटक करण्यात यश आले. अवघ्या तीन तासांत या पथकाने शेखला अटक केली. पोलिसांच्या रखवालीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणखीन एक गुन्हा जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती जे.जे. मार्ग पोलिसांनी दिली.>साहब नशा करके लौटनेवाला था ...पोलिसांच्या रखवालीतून पसार झालेल्या मोहम्मद शेखने नशा करण्यासाठी पळ काढल्याची सबब पोलिसांना दिली. ‘तिथून पळ काढल्यानंतर मी मित्राचे घर गाठले. नशेमुळे घरातले ओरडतात. त्यामुळे मित्राकडून ५० रुपयांची उधारी घेत त्याचे शर्ट घालून बाहेर पडलो. नशा करून पुन्हा येणार होतो,’ असे त्याने पोलिसांना सांगितले. ‘साहब नशा करके लौटने वाला था... इतनी भागदौड क्यू की?’ असे शेखनेच पोलिसांना विचारले.