शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

दंगल हा भाजपाचा निवडणूक ट्रेलर, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 04:47 IST

जीएसटी व नोटाबंदीमुळे विकासाचा दर मंदावला आहे. नरेंद्र व देवेंद्र सरकार विकासाच्या मुद्यावर अपयशी ठरले आहे.

श्रीगोंदा (अहमदनगर) : जीएसटी व नोटाबंदीमुळे विकासाचा दर मंदावला आहे. नरेंद्र व देवेंद्र सरकार विकासाच्या मुद्यावर अपयशी ठरले आहे. निवडणुकीची चाहूल लागताच हिंसाचार, जातीयवाद, दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कोरेगाव भीमाची जातीय दंगल हा भाजपाने केलेला ट्रेलर होता, असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी श्रीगोंदा फॅक्टरी येथे बोलताना केला.राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त शेतकरी मेळावा झाला. कृषी प्रदर्शन व नागवडे साखर कारखाना प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. चव्हाण म्हणाले, पिकाला हमीभाव मिळत नसल्याने शेतक ºयांचे कंबरडे मोडले आहे. कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने जाचक अटी घालून शेतकºयांची कुचेष्टा केली आहे. पण उद्योगपतींना २ लाख १२ हजार कोटींची कर्जमाफी करण्यासाठी मोदी सरकारकडे पैसा कोठून येणार आहे. हा पैसा जनतेच्या खिशातून जाणार आहे. शिवाजीराव नागवडे यांनी काँग्रेसच्या विचाराचा झेंडा खांद्यावर घेऊन श्रीगोंद्यासारख्या दुष्काळी तालुक्याचे चित्र बदलण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांचा आदर्श घेऊन कार्यकर्त्यांनी राजकारणात राहून सहकारी संस्था चालविण्याची गरज आहे.माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, नागवडेबापूंनी समाजाचे हित आणि कामातून आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. ते अनेक संस्थांवर काम करीत आहेत. हे त्यांच्या कर्तृत्वाचे यश आहे. शिवाजीराव नागवडे म्हणाले, राजकारणाला अडचणीच्या काळात सुरूवात केली. तत्त्व आणि निष्ठेचे राजकारण करीत असताना अनेक अडचणी आल्या, पण जिवाभावाच्या कार्यकर्त्यांनी भक्कम साथ दिली. त्यामुळे राजकारणातून समाजाचे हित साध्य करता आले, याचा आनंद आहे.