शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी जागेनुसार की दर्जानुसार?

By admin | Updated: April 12, 2016 03:27 IST

‘आपल्याकडे आलेली जास्तीची औषधे दुसऱ्या रुग्णालयांना द्या; अथवा, जास्त जागा व्यापणाऱ्या औषधांचे आदेश रद्द करा,’ असा अजब आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य

- अतुल कुलकर्णी, मुंबई‘आपल्याकडे आलेली जास्तीची औषधे दुसऱ्या रुग्णालयांना द्या; अथवा, जास्त जागा व्यापणाऱ्या औषधांचे आदेश रद्द करा,’ असा अजब आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांनी काढला आहे. त्यामुळे औषधांच्या दर्जानुसार त्यांची खरेदी होते की आकारमानानुसार, असा सवालही पुढे आला आहे.औषधांची वारेमाप खरेदी तर झाली, पण या औषधांचे पुढे करायचे काय? अशी विचारणा होऊ लागल्यानंतर आयुक्तांनी आरोग्य सेवा संचालकांना ५ आॅगस्ट २०१५ रोजी एक पत्र पाठवले. त्यात, २६ औषधांचा विविध शहरांना करण्यात आलेला पुरवठा हा त्यांच्या एकूण मागणीपेक्षा जास्त आहे, त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आपण त्याचे ‘रीडिस्ट्रिब्युशन’ करावे, असा सल्ला दिला. तो देताना आयुक्त पुढे म्हणतात, जर हे शक्य नसेल तर साठागृहातील जास्त जागा व्यापणारी (स्पेस आक्यूपार्इंग) द्रव स्वरूपातील औषधे, सामग्रींचे आदेश पुरवठादाराला सांगून रद्द करा किंवा टप्प्याटप्प्याने पुरविण्याची व्यवस्था करा. अशा ९ औषधांची यादीच त्यांनी दिली आहे.औषधे जागेच्या गरजेनुसार घ्यायची की, रुग्णांच्या गरजेनुसार हा मूलभूत प्रश्न यातून निर्माण झाला असून, अशी जास्तीची औषधे घ्या असे या विभागाला कोणी सांगितले होते? घेतल्यानंतर औषधे ठेवण्यासाठी गोदाम भाड्याने घ्या, असा सल्ला कोणाच्या डोक्यातून आला? गोदामाचे भाडे निविदा मागवून ठरवायचे असते की, तडजोड करून ठरवायचे असते? गोदामात औषधांचे तापमान व्यवस्थित राखण्याची कोणती व्यवस्था आहे? असे अनेक प्रश्नही या सगळ्यातून निर्माण झाले आहेत.स्वस्त औषधांचा दुराग्रहआम्ही स्वस्त औषधे घेतो, आणि राज्याचा वैद्यकीय शिक्षण विभाग मात्र महागडी औषधे घेतो, असे सांगून स्वत:ची पाठ थोपटून घेण्याच्या नादात अनेक कचरा औषधांची खरेदीही या विभागाने केली आहे. परिणामी, दर्जा नसलेली औषधे घेतली गेली आहेत. दुसरीकडे ज्या औषधांची गरज आहे, त्यांची मात्र खरेदी केली गेली नाही, ‘आम्हाला गरज असणारी एवढी औषधे हवी आहेत,’ असे पत्र काही अधिकाऱ्यांनी आरोग्य संचालकांना दिले आहे, तेही आमच्याकडे उपल्बध आहे.