शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सैराट चालकांमुळे वाढले अपघात

By admin | Updated: January 17, 2017 03:49 IST

नगरपरिषद हद्दीत तसेच गाव, खेडोपाडयातील रस्त्यांवर सध्या सुसाट बाईकस्वारांचा धुमाकूळ वाढला

शौकत शेख,

डहाणू- नगरपरिषद हद्दीत तसेच गाव, खेडोपाडयातील रस्त्यांवर सध्या सुसाट बाईकस्वारांचा धुमाकूळ वाढला आहे. बाईकस्वार तसेच चार चाकी वाहन चालक मोठया वेगाने वाहन चालवित असल्याने जेष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला यांना रस्त्यांवरून चालणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र पोलीस व आरटीओ या बाबतीत गांभिर्याने लक्ष घालत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.डहाणू-चारोटी राज्यमार्ग रूंद झाल्याने तिथे सकाळी व रात्रीच्या वेळेस स्टंट करण्याचा प्रयत्न काही अति उत्साही चालक करतात. तर दिवसाही वेगाचे भान ठेवता काही चालक धूम स्टाईलने दुचाकी नेतात. रस्ते रुंद व मोठे असल्याने संध्याकाळच्या सुमारास गंजाड येथे मोठया प्रमाणात आदिवासी तरूण ताडी पिण्यासाठी दुचाकीवर ट्रिपल सीट घेऊन जात असतात. त्यामुळे सर्वात जास्त अपघात या महामार्गावर होत असतात. गेल्या शनिवारी दुपारच्या सुमारास वधना येथे अपघात होऊन नबी मलिक हा जागीच ठार झाला. तर गंजाड ढाकपाडा येथे टमटम व स्वीफ्टची समोरासमोर टक्कर होऊन टमटमचा चालक नायक हा गंभीर जखमी झाला. शिवाय डहाणूच्या इराणी रोडवर एका चारचाकी वाहनाने मोटरसायकलला ठोकर मारल्याने तीन जण गंभर जखमी झाले. वरोर-चिंचणी मार्गावर वृध्द आदिवासी महिला रस्ता ओलांडत असतांना तिला कारने जोरदार धडक दिल्याने तिच्या डोक्याला, पायाला, गंभीर दुखापत झाली. चिंचणी-तारापूर महामार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थी धूम स्टाईलने मोटार सायकल चालवित असल्याची तक्रार पोलीसात करण्यात आली आहे. (वार्ताहर)>कडक कारवाई व्हावीविना लयसन्स, कागदपत्रे न बाळगात वाहन चालविणे, मोटार सायकलवर ट्रिपलसीट नेणे, पार्कींग झोन नसतांना रस्त्यांमध्ये गाडी उभी करणे, मद्यप्राशन करून गाडी चालविणे, अवैध प्रवासी वाहतूक, असे गुन्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई करणारी मोहीम राबवावी अशी मागणी आहे.