शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अपघातास शिक्षकांना जबाबदार धरणार

By admin | Updated: February 6, 2016 02:21 IST

शाळा वा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहलीदरम्यान शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्यास त्यास संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य वा मुख्याध्यापक आणि सहलीबरोबर असणाऱ्या शिक्षकांना जबाबदार धरण्यात येणार

मुरुड : शाळा वा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहलीदरम्यान शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्यास त्यास संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य वा मुख्याध्यापक आणि सहलीबरोबर असणाऱ्या शिक्षकांना जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच शिक्षण विभागामार्फत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.पुणे येथील आबेदा इनामदार महाविद्यालयातील चौदा विद्यार्थ्यांना मुरुड-जंजिरा येथे जीव गमवावा लागला. अशा घटना घडू नयेत म्हणून शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी सहलीसाठी घ्यावयाची खबरदारी आणि नियमांचे परिपत्रक जारी केले आहे. सहलीसाठी त्याचे पालन करणे प्रत्येक शाळेवर आता बंधनकारक राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत हेळसांड झाल्यास, त्यांना शारीरिक व मानसिक त्रास झाल्याची तक्रार पालकांनी केली तर त्यास जबाबदार शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना कारवाईला सामोरे जावे लागले.सहलीसाठी नियमावली दिली. त्यात समुद्रकिनारे, अतिजोखमीची पर्वतांवरील ठिकाणे, नदी, तलाव, विहिरी, उंच टेकड्या आदि ठिकाणी शैक्षणिक सहली काढू नयेत, दोन प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहलीबाबत आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बचावासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे,सहलीबरोबर प्रथमोचार पेटी वा ज्या ठिकाणी सहल जाणार तेथील शासकीय रुग्णालये आणि डॉक्टरांचे संपर्क क्रमांक बरोबर असावेत, सहलीचा आराखडा पालकांपर्यंत पोचवावा. त्यांच्या सूचनांची दखल घ्यावी. गरज भासल्यास सहलीबरोबर पालकांचा एक प्रतिनिधी पाठवावा,सहलीपूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक आहे. तसेच सहलीच्या ठिकाणी असलेली भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणानुसार घ्यावयाची काळजी याचे मार्गदर्शन शाळांनी विद्यार्थ्यांना केले पाहिजे, सहलीसाठी एसटी बस किंवा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची मान्यता दिलेल्या बसेस वापराव्यात, दहा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक पाठवावा. विद्यार्थ्यांना एकटे वा नजरेआड फिरण्यास सोडू नये, शिक्षकांनी तंबाखू, गुटखा आणि अन्य मादक पदार्थांचे सेवन करू नये, विद्यार्थ्यांना मोबाइल फोन वापरण्याची मुभा द्यावी. त्यांना पालकांच्या संपर्कात राहण्याची सूचना द्यावी,माध्यमिक विद्यार्थ्यांना ट्रेकिंग, जलक्रीडा इ.साठी परवानगी देवू नये आदी नियमांचा समावेश आहे. (वार्ताहर)शैक्षणिक सहलीचा कालावधी हा एक मुक्कामापेक्षा अधिक काळ असू नये,राज्याबाहेर सहल काढण्यास शिक्षण विभागाकडून परवानगी मिळणार नाही,सहलीत विद्यार्थिनींचा सहभाग असेल तर एक महिला शिक्षिका आणि एक महिला पालकप्रतिनिधी सोबत नेणे बंधनकारक राहील, विद्यार्थी, विद्यार्थिनींबरोबर कोणतेही गैरवर्तन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल आदींचा या नियमावलीत समावेश आहे.