शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

एक्स्प्रेस-वेवर कारला अपघात

By admin | Updated: December 21, 2015 02:12 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माडपजवळ रविवारी दुपारी आय-२० कारला झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांसह तीन महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला.

खालापूर : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माडपजवळ रविवारी दुपारी आय-२० कारला झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांसह तीन महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून गुजरात राज्यातील सुरतमधील हे कुटुंब फिरण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. पुण्यावरून मुंबईला जात असताना चालकाचे भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डाव्या बाजूला जावून झाडावर आदळली. या अपघातातील जखमींवर कळंबोली येथील एम.जी.एम. रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरत येथे राहणारे प्रणव पटेल (३२) आपल्या कुटुंबासह महाराष्ट्रात फिरण्यासाठी आले होते. पुणे येथून पटेल आपल्या कुटुंबासह जी.जे. ०५ जे.डी. ४२५१ या क्र मांकाच्या आय-२० कारने मुंबईकडे जात असताना खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माडप व कुंभिवली गावाच्या दरम्यान भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डाव्या बाजूला असलेल्या झाडावर जावून धडकली. यामध्ये अंजू पटेल (३२), दिना सिंग (४३) या दोन महिला जागेवरच ठार झाल्या तर या अपघातात पूर्व पटेल या तीन महिन्याच्या बालकाचाही मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये प्रणव पटेल व मनीष जयंतीलाल (३२) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. या अपघाताची नोंद खालापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक विकास रामुगडे पुढील तपास करीत आहेत.(वार्ताहर)