शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कार झाडावर आदळल्याने अपघात, दोन जणांचा मृत्यू

By admin | Updated: July 17, 2017 17:43 IST

ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव कार रोडच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 17 : ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव कार रोडच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. यात महिलेचा घटनास्थळीच तर दुसऱ्या उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान - तारसा मार्गावरील बोरी फाट्याजवळ सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.मंदा दिलीप बगमारे (५०) व सेवकराम हरिश्चंद्र अलोणे (५०) दोघेही रा. नागपूर अशी मृतांची नावे असून, जखमींमध्ये लक्ष्मण शिकरे (५७) व तातोजी नागतोडे (६५) दोघेही रा. नागपूर यांचा समावेश आहे. सेवकराम अलोणे यांचे मोठे भाऊ ज्ञानेश्वर अलोणे, रा. हिवरा, ता. मौदा यांचे निधन झाल्याने त्याच्या चौदावीचा कार्यक्रम असल्याने चौघेही एमएच-४९/बी-४२१३ क्रमांकाच्या कारने कन्हान मार्गे हिवरा येथे जात होते. दरम्यान, बोरी शिवारातील नाल्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ही कार रोडच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. त्यात कारमधील चौघेही गंभीर जखमी झाले. त्यातच मंदा बगमारे यांचा काही वेळातच घटनास्थळी मृत्यू झाला. या मार्गाने जाणाऱ्यांनी या घटनेची माहिती लगेच कन्हान पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि तिन्ही जखमींना लगेच कामठी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिथे सेवकराम अलोणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंदा बगमारे या सेवकराम अलोणे यांची आतेबहीण होय. अन्य दोन जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.