शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात

By admin | Updated: May 9, 2016 03:32 IST

दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार, तर दोन वर्षांच्या चिमुरड्यासह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलादपूर : दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार, तर दोन वर्षांच्या चिमुरड्यासह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर लोहारे गावच्या हद्दीत सिद्धिविनायक पेट्रोलपंपासमोर रविवारी दुपारी हा अपघात घडला.नाशिकचे रहिवासी संदीप सहस्रबुद्धे (५०) हे पत्नी चित्रा (४५), मुलगा अनिकेत (२०) आणि मेहुणी लक्ष्मी कुलकर्णी (४०), मेहुणीचा मुलगा पीयुष कुलकर्णी (१७) यांना घेऊन स्विफ्ट कारने मुंबई-गोवा महामार्गावरून चिपळूण येथे होते. चिपळूणहून मुंबईकडे येणाऱ्या वॅगनार कारशी त्यांची लोहारे गावाजवळ जोरदार धडक झाली. या अपघातात वॅगनार कारचा चालक प्रसाद मदनाथ (४५) आणि रेश्मा नरवडे (४०) हे दोघे जागीच ठार झाले, तर श्रृती मदनाथ (४०), वामनराव नरवडे (४५) हे गंभीर जखमी झाले असून, दोन वर्षांचा शौर्य प्रसाद मदनाथ हाही अत्यवस्थ आहे. स्विफ्ट कारमधील अनिकेत सहस्रबुद्धे, पीयुष कुलकर्णी, लक्ष्मी कुलकर्णी, चित्रा सहस्रबुद्धे आणि संदीप सहस्रबुद्धे हे पाच जण गंभीर जखमी आहेत. या सर्वांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी चिपळूण व मुंबई येथे हलविण्यात आले आहे.