शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

पतीची हत्या करून भासवला अपघात

By admin | Updated: May 17, 2017 01:17 IST

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या करून तो अपघाताने मेल्याचा बनाव करणाऱ्या स्वाती नितीन नायर (२५) नामक महिलेविरुद्ध बजाजनगर पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या करून तो अपघाताने मेल्याचा बनाव करणाऱ्या स्वाती नितीन नायर (२५) नामक महिलेविरुद्ध बजाजनगर पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नितीन रमेश नायर (२७) असे मृताचे नाव असून, ते मूळचे केरळचे रहिवासी होते. रोजगाराच्या निमित्ताने ते बैतूल (मध्यप्रदेश) येथे स्थायिक झाले होते. स्वातीचे पहिले लग्न झाले अन् काडीमोडही झाला. त्यानंतर नितीनशी तिने दुसरे लग्न केले होते. नितीनने काही वर्षांपूर्वी भोपाळला टायरचे शोरूम सुरू केले अन् ते पत्नीसह तेथेच राहू लागले. औषधोपचारानिमित्त हे दाम्पत्य नागपुरात आले होते.२९ एप्रिलला रात्री १०च्या सुमारास नितीनचा पायरीवरून पडल्याने मृत्यू झाल्याचा स्वातीने कांगावा केला आणि याची माहिती बजाजनगर पोलिसांना दिली. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, शवविच्छेदनात नितीनची गळा दाबून हत्या झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. तसेच नितीनचा भाऊ हरगोविंद रमेश नायर (२५) यानेही पोलिसांना स्वातीच्या अनैतिक संबंधांचा उलगडा करणारे काही पुरावे दिले. त्यानंतर पोलिसांनी स्वातीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.पोलीस पथक केरळकडेनितीनच्या अंत्यसंस्कारानंतर स्वाती आईवडिलांसोबत लगेचच केरळला निघून गेली. त्यामुळे बजाजनगर पोलिसांचे पथक स्वातीला अटक करण्यासाठी केरळकडे निघाले आहे. या हत्येत अन्य कुणाच्या सहभागाबाबतही माहिती तिच्याकडून मिळू शकते, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.