शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
3
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
4
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
5
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
6
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
7
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
8
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
9
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
10
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
11
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
12
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
13
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
14
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
15
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
16
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
17
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
18
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
19
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
20
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड

अपघातात पती-पत्नीसह मुलगी ठार

By admin | Updated: May 12, 2014 04:22 IST

लग्न समारंभासाठी जाणार्‍या एका परिवाराच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी व मुलगी जागीच ठार तर मुलगा गंभीर जखमी झाला.

महागाव : लग्न समारंभासाठी जाणार्‍या एका परिवाराच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी व मुलगी जागीच ठार तर मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावरील यवतमाळ जिल्ह्यातील महागावजवळ रविवारी सकाळी ८.४५ वाजता घडला. ट्रकने दुचाकीला एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. संतप्त जमावाने पळून जाणार्‍या ट्रकची तोडफोड केली. दिगांबर येसाजी पाटे (३६), पत्नी सविता दिगांबर पाटे (३२), मुलगी गायत्री दिगांबर पाटे (१०) रा. कासारबेहळ ता. महागाव असे मृतांची नावे आहे. तर राहुल दिगांबर पाटे (७) हा या अपघातात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तालुक्यातील कासारबेहळ येथील दिगांबर पाटे आपल्या परिवारासह एका लग्नसमारंभासाठी धारमोहा येथे जात होते. दुचाकी एम.एच.२९-एफ-९१४५ वर पत्नी सविता, मुलगी गायत्री, मुलगा राहूल असे चौघे जात होते. महागाव जवळील एका वळणावर समोरुन येणार्‍या भरधाव ट्रक एम.एच.३४-एम-९४६७ ने दुचाकीला जबर धडक दिली. पत्नी सविता ट्रकच्या खाली आली. मुलीच्या पायावरून चाक गेले तर दिगांबर फेकला गेला. तसेच मुलगाही दूर फेकला गेला. पती-पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्रकमध्ये अडकलेली दुचाकी एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेली. अपघात झाल्याचे माहीत होताच शेकडो नागरिक घटनास्थळी धडकले. रक्तामासाच्या सड्यात पडलेले मृतदेह पाहून प्रत्येकाचे हृदय हेलावून जात होते. दरम्यान काही नागरिकांनी ट्रकला अडवून त्याची तोडफोड केली. मात्र ट्रक चालक पसार होण्यात यशस्वी झाला. दिगांबर हा घरचा कमावता तरुण होता. चार भावात तो सर्वाम मोठा होता. त्याच्याकडे सहा एकर जमीन असून त्याच्याच भरोश्यावर कुटुंब होते. लग्न समारंभासाठी जात असताना काळाने त्याच्या झडप घातली. लग्नसमारंभात या अपघाताची माहिती होताच प्रत्येक जण हळहळताना दिसत होते. (तालुका प्रतिनिधी)