शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

By admin | Updated: July 8, 2016 19:16 IST

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील शासकीय वाहनाला शुक्रवारी सकाळी अपघात झाला. यात त्यांच्या दोन सुरक्षा रक्षकांसह वाहनचालक आणि एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाले आहेत

ऑनलाइन लोकमतचंद्रपूर : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील शासकीय वाहनाला शुक्रवारी सकाळी अपघात झाला. यात त्यांच्या दोन सुरक्षा रक्षकांसह वाहनचालक आणि एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाले आहेत. चंद्रपूरपासून १० किलोमीटर अंतारवरील मोरवा गावाजवळ ही घटना घडली.

मंत्रीमंडळातील फेरबदलानंतर आपल्या नव्या खात्याचा पदभार घेण्यासाठी ना. अहीर चंद्रपुरातील आपल्या निवासस्थानाहून सकाळी पाऊणेसहा वाजता शासकीय वाहनाने नागपूरकडे रवाना झाले होते. सकाळपासूनच पाऊस सुरु होता. दरम्यान, मोरवानजीकच्या शनिमंदिराजवळ तञयांच्या ताफ्यातील एमएच ३४, जी ९९९९ या शासकीय वाहनाच्या चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे वाहन अनियंत्रीत होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जावून आदळले. यात वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. घटना घडली तेव्हा वाहनामध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक आंबुलकर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष पंडीत, वाहनचालक सतीश उपाध्याय आणि मंत्र्यांचे कार्यकर्ते संतोष यादव होते. या चौघांनाही पोलिसांनी तातडीने चंद्रपुरातील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले.

अपघात घडला तेव्हा मंत्र्यांचा ताफा बराच पुढे निघून गेला होता. मात्र अपघाताचे वृत्त कळताच ते माघारी आले. घटनास्थळाची पहाणी करून व त्यानंतर रूग्णालयात जावून त्यांनी सर्व जखमींची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी दिल्लीचा नियोजित दौराही रद्द केला.

अपघाताचे वृत्त कळताच त्यांच्या चाहत्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र अपघातग्रस्त वाहनात मंत्री नसल्याचे कळल्यावर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दुपारपर्यंत भेटीसाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.  

मंत्री अपघातातून बचावलेकेंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा ताफा घरून निघाला तेव्हा हंसराज अहीर एमएच ३४, जी ९९९९ याच वाहनात बसले होते. यापूर्वी खत रसायन मंत्री असताना ते हेच वाहन नेहमी वापरत असत. मात्र गृहराज्यमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी नवे शासकीय वाहन आले होते. शहराबाहेर ताफा निघाल्यावर काही वेळाने ना. अहीर त्या वाहनातून उतरून दुसऱ्या वाहनात बसले. काही अंतर पुढे गेल्यावर ही अपघाताची घटना घडली. त्या वाहनात नसल्याने ते सुदैवाने अपघातातून बचावले.