शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

स्वमग्न जगण्याचा स्वीकार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 01:35 IST

भारतात ६६ मुलांपैकी १ मूल स्वमग्न आहे, जगभरात हेच प्रमाण ६८ पैकी १ असे असल्याची संयुक्त राष्ट्रसंघाची आकडेवारी सांगते. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात १९ वर्षाखालील ७८

मेघना ढोके, नाशिकभारतात ६६ मुलांपैकी १ मूल स्वमग्न आहे, जगभरात हेच प्रमाण ६८ पैकी १ असे असल्याची संयुक्त राष्ट्रसंघाची आकडेवारी सांगते. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात १९ वर्षाखालील ७८ लाखांहून अधिक मुले दिव्यांग आहेत. मात्र या आकडेवारीच्या पलिकडे जावून विचार केला तर आजही स्वमग्नता असणाऱ्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे प्रश्न, समाजासह कुटुंबाने करण्याचा स्वीकार हे प्रश्न गंभीर आहेत.स्वमग्नता जागरुकता दिनानिमित्त यावर्षी संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीनेही काम करण्यात येत आहे. ‘टूवर्ड अ‍ॅटॉनॉमी अ‍ॅण्ड सेल्फ डिर्टर्मिनेशन!’ अशी ही संकल्पना आहे. स्वमग्नता असणाऱ्या मुलांना पूर्ण स्वायत्तता, स्वयंनिर्णयता आणि स्वयंपूर्णता देण्यासाठी पालकांसह शिक्षक आणि समाजाने एकत्रित काम करावे, हे या संकल्पनेत अभिप्रेत आहेच. मात्र हे सारे तेव्हाच होईल जेव्हा स्वमग्न मूलांचा पूर्ण स्वीकार पालकांनीही केला तर!विशेषत: भारतासारख्या देशात स्वमग्नता असणाऱ्या मुलांचा पूर्ण स्वीकार आणि त्यांचे पालनपोषण यासंदर्भातील अज्ञान, गैरसमजूती यासंदर्भातील प्रश्न आजही बिकट आहेत. ग्रामीण भागात माहितीचा अभाव आहे. त्यातून पालक मुलाच्या योग्य निदानापर्यंत आणि उपचारासह प्रशिक्षणापर्यंत पोहोचत नाहीत. शहरी भागात आता एक नवीन प्रश्न दिसतो आहे. अनेक पालक गुगलसह इंटरनेटवर माहिती शोधून त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे स्वत:च उपचार तरी करू पाहतात किंवा योग्य निदानापर्यंत पोहोचत नाही. दोन्हीही संदर्भात मुलांचा स्वीकार, उपचार आणि स्वयंपूर्णता यासंदर्भात वेळीच काम सुरु होत नाही. आपल्या मुलाच्या आजारावर रामबाण औषध नाही पण आयुष्य जगायला आपण त्याला स्वयंनिर्भर करू शकतो यादिशेने विचार होत नाही, हे आजही आपल्या समाजातील वास्तव आहे.