शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोरेच्या समभाग खरेदीला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:01 IST

रत्नागिरी : शासनाच्या समभागाच्या प्रमाणामध्ये अतिरिक्त ७०२ कोटी ५७ लाख ७६ हजार रुपयांचे समभाग टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

ठळक मुद्दे अतिरिक्त ७०२ कोटी : कºहाड-चिपळूण मार्गाचा समावेशकोकण रेल्वेचे विद्युतीकरण, रोहा-वीर मार्गाचे दुहेरीकरण, ही कामे प्रामुख्याने केली जाणार आहेत.या सर्व प्रकल्पांची अंदाजित किंमत ९६९० कोटी आहे

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : कोकण रेल्वे महामंडळाच्या वाढीव भागभांडवलात शासनाच्या समभागाच्या प्रमाणामध्ये अतिरिक्त ७०२ कोटी ५७ लाख ७६ हजार रुपयांचे समभाग टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच पहिला हक्कभाग म्हणून चालू आर्थिक वर्षात ६८ कोटी २० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली.

कोकण रेल्वे महामंडळाने निमार्णाधीन आणि प्रस्तावित प्रकल्पांसाठी अतिरिक्त भागभांडवल उभारण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार कोकण रेल्वेची परिवहन क्षमता दुपटीने वाढविणे व अतिरिक्त २१ क्रॉसिंग स्थानकांची निर्मिती करणे, कोकण रेल्वेचे विद्युतीकरण, रोहा-वीर मार्गाचे दुहेरीकरण आणि कºहाड-चिपळूण रेल्वेमार्गाची उभारणी, ही कामे प्रामुख्याने केली जाणार आहेत.

या सर्व प्रकल्पांची अंदाजित किंमत ९६९० कोटी आहे. या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक असल्याने कोकण रेल्वे महामंडळाचे प्रशासकीय भागभांडवल चार हजार कोटी इतके करण्यात येणार आहे. त्यात राज्य शासनाचा हिस्सा ८८० कोटींचा असून, सद्यस्थितीतील भागभांडवल वजा जाता अतिरिक्त ७०२ कोटी ५७ लाख रुपयांच्या वित्तीय भारास मंजुरी देण्यात आली.

कोकण रेल्वे महामंडळाच्या प्राधिकृत भागभांडवलात वाढ करण्याच्या प्रस्तावात कºहाड -चिपळूण (१११.५० किमी) या प्रकल्पाचा समावेश आहे. हा रेल्वे प्रकल्प रेल्वे मंत्रालय पीपीपी तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. एकाच प्रकल्पात थेट ५० टक्के आर्थिक सहभाग घेण्यासह प्रकल्प राबवणाºया यंत्रणेत अतिरिक्त समभागांची खरेदी करणे संयुक्तिक नसल्यामुळे या प्रकल्पाच्या खर्चातील राज्य शासनाचा ५० टक्के आर्थिक सहभागासाठी ७ जून २०१२ रोजी देण्यात आलेला प्रशासकीय मंजुरीचा आदेश रद्द करण्यासही मंजुरी दिली.या मार्गावरून प्रतिदिन ४१ मेल-एक्सप्रेस आणि १७ मालवाहतुकीच्या गाड्या चालवल्या जात आहेत. मंगळुरू (ठोकूर) ते रोहा या एकेरी वाहतुकीच्या वाढीस फारच कमी वाव आहे. त्यामुळे भविष्यातील वाहतूक सुधारणांसाठी अस्तित्त्वातील रेल्वे मार्गाची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. दुहेरीकरण व विद्युतीकरण प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक असल्याने कोकण रेल्वे महामंडळाने भागभांडवलात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रस्तावित चारही प्रकल्प राज्यातील आहेत. या प्रकल्पांनादेखील चालना मिळेल.रेल्वे मार्गाचा बराचसा भाग महाराष्ट्रातूनकोकण रेल्वे महामंडळाची स्थापना केंद्र शासन आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या राज्यांमध्ये १९९०मध्ये झालेल्या करारानुसार करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्र शासन ५१ टक्के, महाराष्ट्र २२ टक्के, कर्नाटक १५ टक्के, गोवा ६ टक्के केरळ ६ टक्के अशी भागभांडवलाची रचना करण्यात आहे. अतिशय दुर्गम असलेला रोहा ते मंगळुरू (७६० किमी) दरम्यानचा कोकण रेल्वे मार्गाचा बराचसा भाग महाराष्ट्रातून (३८२ किमी) जातो. कोकण रेल्वेने बीओटी मॉडेलच्या माध्यमातून बांधकाम आणि पायाभूत सुविधा पुरविण्यामध्ये अनेक निकष प्रस्थापित केले आहेत.