शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भूखंडवाटपाची ‘एसीबी’ चौकशी

By admin | Updated: December 28, 2015 04:02 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंडवाटपात अमरावती विभागामध्ये झालेल्या गैरप्रकाराची आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत(एसीबी) चौकशी केली जात आहे.

राजेश निस्ताने, यवतमाळमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंडवाटपात अमरावती विभागामध्ये झालेल्या गैरप्रकाराची आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत(एसीबी) चौकशी केली जात आहे.यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या पाच जिल्ह्यांतील एमआयडीसीच्या भूखंडवाटपातील घोळ ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे चव्हाट्यावर आणला होता. त्याची दखल घेत उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी या भूखंडवाटपाला स्थगनादेश देऊन सखोल चौकशीचे निर्देश दिले होते. हा स्थगनादेश अद्याप कायम आहे. एमआयडीसीचे मुंबई येथील डेप्युटी सीईओ गोविंद बोडखे यांच्यामार्फत ही चौकशी केली जात आहे. त्यांनी नुकतीच अमरावती व यवतमाळात भेट देऊन एमआयडीसीच्या भूखंडांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. एसीबीचे अमरावती येथील एसपी महेश चिंचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भातकुले गोपनीय चौकशी करीत आहेत. भूखंड मागणीसाठी आलेले प्रस्ताव, नाकारलेले प्रस्ताव, त्यामागील कारणे, किती दिवसांत भूखंड मंजूर झाले, केव्हापासून प्रस्ताव प्रलंबित आहेत, या सर्व बाबींची माहिती (रेकॉर्ड) एसीबीने एमआयडीसीच्या अमरावती प्रादेशिक कार्यालयातून ताब्यात घेतली आहे. एमआयडीसीच्या थेट सीईओ कार्यालयाशी संधान बांधून विशिष्ट वर्गातील श्रीमंत व्यापाऱ्यांना हे भूखंड दिले गेले आहेत. बीअर बार, रेस्टॉरंट, हॉटेल यासाठी दोन ते चार एकराचे भूखंड आरक्षित केले गेले आहेत. एकाच व्यक्तीकडे उद्योग न उभारताही अनेक भूखंड आहेत, तर कित्येकांनी १० वर्षांपासून उद्योगाशिवाय भूखंड आपल्या ताब्यात ठेवले आहे. ते परत घेण्याची प्रत्यक्ष कारवाई एमआयडीसीने एवढ्या वर्षांत केलेली नाही. केवळ नोटीसची खानापूर्ती करून कारवाईचा देखावा निर्माण केला गेला आहे.